My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Thursday, 25 January 2024

घोडगाव येथील साने गुरुजी वाचनालयास डॉ.विकास हरताळकर यांनी दिली पुस्तके भेट...

 घोडगाव येथील साने गुरुजी वाचनालयास डॉ.विकास हरताळकर यांनी दिली पुस्तके भेट...

घोडगाव ता चोपडा येथील साने गुरुजी वाचनालयास चोपडा येथील सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉ. विकास हरताळकर यांनी आज सदिच्छा भेट देऊन ५०० पुस्तके भेट दिली. या प्रसंगी त्यांचा सत्कार वाचनालयाचे ग्रंथपाल विजय दामोदर कोळी यांनी केला.या छोटेखानी समारंभात वाचनालयाचे चिटणीस विठ्ठल पुंडलिक पाटील यांनी प्रास्ताविक केले.वाचनालय चे अध्यक्ष प्रा. प्रदीप लिंबा पाटील यांनी आभार मानलेया प्रसंगी माजी सरपंच दिलीप कोळी, नरेंद्र विसपुते, ग्राम पंचायत सदस्य सुनील कोळी, युवराज रहाते, विजय न्हावी, चेतन बाविस्कर, विठ्ठल कोळी, संदीप पाटील, छोटू सोनार, भवरलाल जैन, बापू कोळी, हजर होते.






No comments:

Post a Comment