Received Third Prize in Computer Intelligence Competition For Teachers organized by Jyana Prabodhini Nigdi Kendra.
Received Third Prize in Computer Intelligence Competition For Teachers organized by Jyana Prabodhini Nigdi Kendra.
राज्यस्तरीय निबंध स्पर्धा , कथा लेखन स्पर्धा व अलक लेखन स्पर्धा यांचा पारितोषिक वितरण सोहळा
पुणे : वाचक आणि लेखक घडवण्याचे मोठे काम पुणे नगर वाचन मंदिर करत आहे. नगर वाचनच्या अशा उपक्रमांमुळे अनेक तरुण लेखक निर्माण होतील. वैभवशाली साहित्य परंपरा जपण्याचे व पुढे नेण्याचे महत्त्वाचे काम ही संस्था करत आहे, असे मत जेष्ठ लेखिका डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी व्यक्त केले.
पुणे नगर वाचन मंदिरातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धा , कथा लेखन स्पर्धा व अलक लेखन स्पर्धा यांचा पारितोषिक वितरण सोहळा डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी लोकसाधना संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजा दांडेकर हे उपस्थित होते. या समारंभात ‘पुनवा’ या संस्थेने प्रकाशित केलेल्या दिवाळी अंकाचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे, कार्यवाह सुवर्णा जोगळेकर , लोकसाधना संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजा दांडेकर व सचिव कैवल्य दांडेकर उपस्थित होते.
ग्रामीण भागात आजही प्रतिभावान लेखक असून त्या लेखकांच्या शब्दांना अंधारातून प्रकाशाकडे आणण्याचे काम पुणे नगर वाचन मंदिर करत आहे , अशी भावना डॉ. राजा दांडेकर यांनी व्यक्त केली.
पुणे नगर वाचन मंदिर, पुणे व लोकसाधना, चिखलगाव यांच्या सहयोगाने ‘उपयोजित लेखन कौशल्य विकास प्रकल्पाचे’ उद्घाटन आज लोकसाधनेच्या शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभिनव कार्यक्रमातून करण्यात आले. या प्रकल्पाची सुरुवात पाच छोट्या विद्यार्थी लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रकाशनाने झाली. श्रेया दुबळे , पल्लवी कासेकर , कणाद दांडेकर , श्रावणी बारे , आर्या पतंगे या विद्यार्थी लेखकांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.
अलका कोठावडे , नीलम क्षत्रिय , मनाली ओक , नीता इनामदार , नीता गोडबोले ,राहुल जोशी , विनया साठे , किशोर करंजकर , भारती पांडे , पार्थ जोशी , साधना झोपे , अभिजित जोगळेकर , नेहा उजाळे , अरुणा गर्जे , प्रणाली सावंत , रंजना शर्मा , कल्याणी जोशी , नारायणी कांबळे , स्वस्ती बोरकर , पर्वणी वैद्य , काव्या दांडेकर , अथर्व पाटील , स्नेहल देवकाते , तन्वी गुडेवार , संस्कृती दौंडकर , यशोधन इनामदार , प्राजक्ता जाधव , सुश्रुत बारड , नेहा पाटील या विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पुणे नगर वाचन मंदिराचे सर्व पदाधिकारी व कार्यकारी मंडळ सदस्य उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाच्या समन्वयाची जबाबदारी कार्यकारिणी सदस्य स्वाती ताडफळे यांनी पार पाडली. डॉ. प्रसाद जोशी यांनी आभार मानले व डॉ. गायत्री सावंत यांनी सूत्रसंचालन केले.
मुलीचा शाळेत पहिला नंबर आला म्हणून बापाने मुलीला हॉटेलमध्ये घेऊन आला आणि वाचा तिथे काय घडले....
मी ऑफिस मधून घरी जाता जाता एका हॉटेलमध्ये गेलो, वेळ संध्याकाळची, तरी 7 वाजलेले, तेच हॉटेल तोच कोपरा तोच चहा आणि मित्राची वाट पाहत बसलो होतो. चहाचा एक झुरका घेतला तेव्हा, माझ्या टेबलासमोरील दुसऱ्या टेबलवर एक माणूस आणि 8 ते 10 वर्षाची त्याची मुलगी येऊन बसली. शर्ट ही फाटका अगदी त्याच्यासारखाच, वरची दोन बटने गायब, मळकी पॅन्ट थोडी फाटकी, मजुरी करणारा मजूर असावा तो माणूस, मुलीने छान दोन वेण्या घातलेल्या, साधारण फ्रॉक पण स्वच्छ धुतलेला होता, तिच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद आणि छान कुतूहल दिसत होते, ती हॉटेलमध्ये सगळीकडे डोळे मोठे करून पाहत होती. डोक्यावर थंडगार हवा सोडणारा पंखा, खाली बसायला गुबगुबीत सोफा, ती अगदी सुखावली होती, वेटरने दोन स्वच्छ ग्लास थंडगार पाणी त्यांच्यासमोर ठेवलं, पोरी करता एक डोसा आणा कि !!. त्या मुलीच्या बापाने वेटरला सांगितलं, मुलीचा चेहरा अजून फुलला, तुम्हाला नाय सांगितले !, असे मुलीनं बाबा ना विचारले, त्यावर बापाने मला काही नको, तो बाप वेटरची नजर चुकवत म्हणाला,
थोड्या वेळात वेटर डोसा, चटणी, सांबार वेगळं घेऊन आला. गरमागरम मोठा फुललेला डोसा खाण्यात ती मुलगी गुंग झाली, तो तिच्याकडे कौतुकाने पाहत पाणी पीत होता.. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला, आजकालच्या भाषेत डब्बा फोन.. तो मित्राला सांगत होता, आज पोरीचा वाढदिवस आहे तिला घेऊन हाटेलात आलो आहे, मी बोललो होतो शाळेत पहिला नंबर आला तर तुझ्या वाढदिवसाला मी हाटेलात मसाला डोसा खायला घालीन म्हणालो होतो. ती खाते डोसा.. श्वास घेऊन नाही र…. दोघांना कुठलं परवडतं, घरी पिठलं भाकर हाय मला गरमागरम!
चहाच्या चटक्याने मी भानावर आलो, कसाही असुदे श्रीमंत, किंवा गरीब बाप हा नेहमीच लेकीच्या चेहऱ्यावर हसू बघण्यासाठी काहीही करेल, मी काउंटरवर चहाचे आणि त्या 2 मसाला डोसा चे पैसे भरले, आणि सांगितलं अजून 1 डोसा आणि चहा तिथे पाठवा! पैसे का नाही असं विचारलं तर सांगा! आज तुमच्या मुलीचा वाढदिवस आहे ना! तुमची मुलगी शाळेत पहिली आली ना! आम्ही ऐकलं तुमचं बोलणं!!म्हणून आमच्या हॉटेल तर्फे खास तुमच्यासाठी, असाच अभ्यास कर म्हणावं याचं बिल नाही, पण फुकट हा शब्द वापरू नका, त्या वडिलांचा स्वाभिमान मला दुखवायचा नव्हता, आणि अजून एक डोसा त्या टेबलवर गेला, मी बाहेरून पाहत होतो, तो म्हणाला कावरा बावरा झाला, पुन्हा म्हणाला मी एकच म्हणालो होतो,तेव्हा मॅनेजर म्हणाले अहो तुमची मुलगी शाळेत पहिली आली! आम्ही ऐकलं ते म्हणून हॉटेल तर्फे आज दोघांनाही फ्री!!!!
त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. तो लेकीला म्हणाला बघ असाच अभ्यास केलास तर काय काय मिळतेया बाप वेटरला म्हणाला हा डोसा बांधून द्याल का मी आणि माझी बायको दोघेभी अर्धा अर्धा खाऊ, घरी तिला कुठं असं खायला मिळत,..!
आता माझ्याही डोळ्यात खळकन पाणी आलं, अतिशय गरिबीतही माणुसकी जपणारी माणसं आहेत अजून या जगात, तुम्हाला असं कोणी आढळलं, तर एखादा मसाला डोसा अवश्य खायला घाला..
🙏🏻
एक लेखक @evryone
श्री. वसंतभाई मयूर यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत कला गौरव पुरस्कार प्रदान
आमचे सगळ्यांचे गुरु संगीताचार्य श्री. वसंत भाई मयूर यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे पंडीत. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या 150 व्या जयंती निमित्त "पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत कला गौरव पुरस्कार" नवी मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.जळगाव जिल्ह्यातील चोपड्या सारख्या, त्या मानाने मोठ्या शहरांपासून दूर, कोपऱ्यात असलेल्या गावात 50-60 वर्षांपूर्वी शास्त्रीय संगीत शिकणे म्हणजे किती कठीण काम होतं ते आजच्या ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कदाचित कळणार नाही. चांगल्या गुरू चा शोध घेणे, खडतर परिस्थितीतही नवीन ज्ञान पदरात पाडून घेण्यासाठी अमळनेर, जळगाव, धुळे, मुंबई इथे जाऊन तबल्याच्या गुरूंचे मार्गदर्शन घेणे, उत्तम संगीत ऐकण्यासाठी धडपड.. सारं काही अवघड. काही वेळा तबला वादक फक्त वाजविण्याचे काम करत, त्यांना एखादा कायदा कसा लिहावा, लिपी, थेअरी वगैरे काहीच भानगड माहीत नसे. तिथे तो बोल किंवा कायदा शिकून, समजून व्यवस्थीत लिपीबध्द करून जतन करून ठेवणे हेही एक जिकिरीचं पण महत्त्वाचं काम त्यांनी केलं. मयूर सरांच्या सुंदर हस्ताक्षरातल्या लिखाणाच्या वह्या, नोट्स हा तर एका पुस्तकाचा चा विषय होईल इतका सुंदर आहे. लाल, हिरव्या, निळ्या रंगात शाईच्या पेनाने लिहिलेल्या वह्या फक्त बघणे हा सुद्धा एक वेगळा आनंद. वर्षानुवर्षे संगीत शास्त्र शिकून, संकलन करून, जतन करून ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचं अत्यन्त महत्त्वाचं काम मयूर सरांनी अव्याहत चालू ठेवलं आहे. जितक्या जिद्दीने, पॅशन ने संगीत शिकण्याचा ध्यास मयूर सरांनी घेतला तितक्याच आत्मीयतेने तो सांगीतिक वसा शिष्यांना ते देण्यासाठीची धडपड असते. गेली 50 वर्ष अव्याहतपणे ही परंपरा कायम राहिली आहे. सकाळी 5 वाजेपासून ते रात्री पर्यंत या मंदिरातली पूजा चालूच असते. शाळेतल्या संगीत शिक्षक या पदाची सार्थ सेवा मयूर सरांनी अगदी मनापासून केली. चोपडा परिसरात संगीत शिक्षक म्हणजे मयूर सर हा एक प्रकारचा मानक होऊन गेलाय. संगीतात विद्यार्थ्यांना घडविणे म्हणजे सोपं काम नाही. लहान लहान वयातल्या पोरांना तबला पेटीवर हात कसा ठेवायचा याच्यापासून पासून ते त्यांच्याकडून रियाझ करवून घेणे, पाठांतर, परीक्षेची तयारी या सर्व गोष्टी म्हणजे अत्यन्त अवघड प्रकार. काहींची आर्थिक परिस्थिती नाजूक तर काहींची शैक्षणिक, सगळ्यांना सांभाळून घेणे, जागोजागी मदत करणे हेही त्यांचं एक महत्त्वाचं काम. संगीतात दगड असलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मयूर सरांनी घडवून त्यांच्या सुंदर मुर्त्या बनवल्या आहेत. तबला, पेटी, गायन यात सरांच्या शेकडो विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलंय, मोठमोठ्या संमेलनात वाजवलंय, पुरस्कार प्राप्त केलेत.
काळाच्या ओघात खूप सारी लेबल आपल्याला चिटकतात, पण 'मयूर सरांचे विद्यार्थी' ही ओळख अजूनही मनाच्या खूप जवळची आहे.
आज गांधर्व महाविद्यालया सारख्या भारतीय संगीतातल्या अग्रगण्य संस्थेने दिलेला पं. पलुस्करांच्या 150 व्या जयंतीच्या वर्षीचा पुरस्कार, सरांच्या संगीत क्षेत्रातील सेवेची घेतलेली दखल, केलेला सत्कार ही आम्हा सगळ्या शिष्यांसाठी आनंदाची पर्वणी आहे.शारदा देवीचा आशीर्वाद गुरू- शिष्यांवर असाच कायम राहो अशी प्रार्थना !!
संगीत महर्षी, गुरुवर्य वसंतभाई मयूर यांना खूप खूप शुभेच्छा !!
--स्वप्नील पोतदार आणि सर्व विद्यार्थीगण
Click Here ➤ Zee 24 तास वरील बातमीची लिंक
संकलन~प्रसाद वैद्य
मिट्टी को नमन वीरों का वंदन म्हणत विवेकानंद विद्यालय,चोपडा तर्फे क्रांति दिन साजरा
दि. ९ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, चोपडा स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्या क्रांतिवीरांचं स्मरण करण्याचा दिवस व जागतिक आदिवासी दिन विवेकानंद विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा, उत्स्फूर्त वक्तृत्व,भित्तिपत्रिका सादरीकरण,गीतगायन व क्रांतिकारकांची वेशभूषा साकारुन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतमाता,आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, स्वा.वीर सावरकर,चंद्रशेखर आझाद व भगतसिंग या क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन व सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांचे स्मरण करण्यात आले. विद्यालयातील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कु.प्रियंका भोई हिने ऐ मेरे वतन के लोगों... हे गीत तर कु.कल्याणी पाटील व कु. गौरवी पाटील या दोघींनी हा देश माझा...हे गीतगायन सादर केले. पुढील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात क्रांतिदिनावर आधारित अतिशय सुंदर वेशभूषा व संवाद सादर केले.
वेशभूषा सादर करणारे इयत्ता सहावीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी
१)अथर्व बोरसे २)गिरीराज पाटील३)यश शिंपी ४)सिद्धांत चौधरी ५)रोहित पाटील ६)निपुण पाटील
७)मो.लबीब शेख इम्रान ८) वेदांत चौधरी ९)ईशान चौधरी १०)सौम्या पाटील
क्रांतिदिनाची माहितीपूर्ण भित्तिपत्रिका बनवणारे इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी
१) आर्यन पाटील २) वेदांत चौधरी ३) श्रीकांत चौधरी. ४) प्रथमेश परदेशी५) स्वरा हरताळकर.६) निशिता चौधरी७) पूजा पाटील.८) ऋतुजा पाटील.९) स्वरा शुक्ल,१०) कोमल पाटील. ११) किमया बडगुजर, १२) रजत पाटील १३) लोकेंद्र येसे १४) यश पाटील.१५) वैष्णवी येसे १६)भूमिका पाटील.
कु. जैनब जावेद तडवी (इ.९वी) हिने आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. उपशिक्षक जावेद तडवी यांनी मोजक्या शब्दात क्रांति दिन व जागतिक आदिवासी दिन याबद्दल विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण माहिती सांगितली. त्यानंतर क्रांति दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व व उत्स्फूर्त वक्तृत्व या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. उपशिक्षक प्रसाद वैद्य व सौ.स्मृति माळी यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे-
प्रथम-चि.सत्यम संजय सोनवणे (इ.१०वी)
द्वितीय-कु.आरुषी प्रदीप पाटील (इ.९वी)
तृतीय-चि. तनीष पवन लाठी (इ.१०वी)
उपशिक्षिका सौ. माधुरी हळपे, सौ.स्मृति माळी श्री.राधेश्याम पाटील व श्रीमती शितल पाटील यांनी या स्पर्धेचे नियोजन केले.
कार्यक्रमाच्या समारोपापूर्वी देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना समर्पित मेरी माटी मेरा देश- मिट्टी को नमन वीरों का वंदन या अभियानाअंतर्गत पंचप्राण प्रतिज्ञा उपशिक्षक श्री. पवन लाठी यांनी सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षकवृंद यांचेकडून म्हणवून घेतली.
कार्यक्रमाचे सुंदर नियोजन व सादरीकरण यामुळे विद्यार्थ्यांनी देशभक्तीचे वातावरण अनुभवले व त्याला दाद दिली.
कलाशिक्षक श्री. राकेश विसपुते यांनी सुंदर फलक लेखन व मेरी मिट्टी मेरा देश या आशयाची सुंदर रांगोळी काढून वातावरण निर्मिती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शितल पाटील यांनी केले.
श्री.पवन लाठी, सर्व शिक्षकवृंद व कर्मचारीवृंद याप्रसंगी उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर,अध्यक्ष डॉ.विजय पोतदार,उपाध्यक्ष श्री. घनश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक श्री.नरेंद्र भावे व पालकवृंद यांनी या वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी व सहभागी विद्यार्थी, वेशभूषा सादर करणारे तसेच माहितीपूर्ण भित्तिपत्रिका बनवणारे विद्यार्थी व सर्व मार्गदर्शक शिक्षकवृंद यांचे कौतुक व अभिनंदन केले.
विवेकानंद विद्यालय,चोपडा तर्फे आभाळाचं दान कार्यक्रमातून कवी ना. धों.महानोरांना श्रद्धांजली . .
प्रतिनिधी, चोपडादिवंगत कविवर्य ना. धों.महानोर यांना श्रद्धांजलीपर ‘आभाळाचं दान अर्थात पाऊसगान' या पावसाच्या संकलित कवितांचा
कार्यक्रम विवेकानंद विद्यालयात आयोजित करण्यात आला. विलास पंढरीनाथ पाटील खेडीभोकरीकर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक जय श्री दादाजी हायस्कुल,तांदळवाडी) हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी महानोरांच्या रेखाचित्राचे पूजन करण्यात येऊन त्यांचा जीवनपरिचय उपशिक्षिका माधुरी हळपे यांनी विद्यार्थ्यांना करुन दिला व रानकवी स्व.ना. धों.महानोर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विद्यालयातील खालील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात पावसाच्या संकलित कविता व काही विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे अतिशय सुंदर गायन व अभिवाचन सादर केले.
कविता सादर करणारे विद्यार्थी
१)प्रांजल सानप (इ.५वी)-रिमझिम रिमझिम पाऊस बरसे...
२)नक्षत्रा सोनवणे (इ.५वी)-बूंदे...
३)आर्यदीप पाटील (इ.५वी)-स्व.ना.धो. महानोर यांची कविता
४)मनाली पाटील व जान्हवी चौधरी(इ.५वी) -अग्गोबाई ढग्गोबाई...
५)प्रियंका भोई (इ.६वी)-धोय धोय पाऊस...
६ ) आरोही पाटील ( इ . ५ वी ) ए आई, मला पावसात जाऊ दे
७)अनुष्का शिंदे (इ.६वी)-पाऊस आला...
८)कल्याणी पाटील व प्रांजल पाटील (इ.६वी) पावसाचे गाणे...
९ ))मुक्ता पाटील (इ.७वी)-पाऊस...
१०)रोहन पाटील (इ.७वी)-पाऊसधारा
११)वैष्णवी पाटील (इ.७वी)-पाऊस मस्तीतला..
१२)दीक्षा देशमुख (इ.७वी)-इंद्रधनुष्य
१३)स्वरा हरताळकर (इ.८वी)-पावसाची कविता
१४)साक्षी रायसिंग (इ.८वी)-पावसाची परी
१५)आर्या जोशी (इ.९वी)-हसरा नाचरा...
१६)सात्विक माळी (इ.९वी)-पाऊस आला...
१७)जैनब तडवी(इ.१०वी)-पाऊस म्हणजे नेमकं असतं तरी काय.?
१८)श्रुती देशमुख (इ.१०वी)-पाऊस
१९)प्रेरणा महाले(इ.१०वी)-पावसात भिजतांना...
तसेच प्रसाद वैद्य यांनी पाऊस ही स्वरचित कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विलास पाटील यांनी आपल्या संकलित आणि दिलखुलास पाऊस कविता सादरीकरणातून विद्यार्थ्यांना चिंब भिजवलं. दिवंगत कविवर्य ना. धों. महानोर यांच्या 'चिंब पावसानं रानं झालं आबादानी....'चा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. या सादरीकरणाच्या दरम्यान विद्यालयातील निवडक विद्यार्थ्यांनी कलाशिक्षक राकेश विसपुते यांच्या मार्गदर्शनाने पावसावर आधारित चित्र रेखाटले व रंगवले.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्याध्यापक श्री. नरेंद्र भावे यांनी विलास पाटील यांचे आभार मानले व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्मृती माळी व श्री. जितेंद्र देवरे यांनी तर श्री.विलास पाटील यांचा परिचय श्री. राधेश्याम पाटील यांनी करुन दिला. मुख्या . श्री. नरेंद्र भावे, श्री. पवन लाठी व सर्व शिक्षकवृंद याप्रसंगी उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर,अध्यक्ष डॉ.विजय पोतदार,उपाध्यक्ष घनश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त व पालकवृंद यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
Click Here► MCQ on Lokmanya Tilak
______________________________________________________
Click Here►लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त ऑनलाइन प्रश्नमंजुषा
______________________________________________________
📘📚📖📋✍🏻
~प्रसाद वैद्य
9420112215
पू. साने गुरुजी :
मातृहृदयी समर्पित शिक्षक :
""""""""""""""""""""""""""""""""""""
पुण्य स्मरण :
प्रा.बी.एन.चौधरी /९४२३४९२५९३.
पांडुरंग सदाशिव साने, हे साने गुरुजी या नावाने साऱ्या महाराष्ट्राला परिचित झालेले होते. त्याकाळी गुरुजींना ओळखत नाही, असा एकही खान्देशी माणूस शोधून सापडणे मुश्किल होते. गुरुजींनी आपल्या जीवनात अनेक भूमिका प्राण ओतून वठविल्या आणि आपल्या समर्पणाच्या वृत्तीने त्यांना अजरामर करुन ठेवल्या. त्यातली महत्त्वाची आणि भावी पिढीला आकार देणारी भूमिका होती शिक्षकाची. साने गुरुजी हे पदवी प्रमाणपत्र घेऊन नोकरी करणारे, पोटार्थी शिक्षक नव्हते. शिक्षकी पेशा त्यांनी व्रत म्हणून स्वीकारला होता. कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक शिक्षण नसताना, केवळ आत्म्याच्या उर्मीतून, नवनिर्मितीच्या ध्यासातून गुरुजींमधला शिक्षक तयार झाला होता. ते मातृहृदयी शिक्षक होते. शाळा ही मुलांना कोंडून ठेवण्याच्या कोंडवाडा नसून, विद्यार्थ्यांवर वेगवेगळे संस्कार करून बघण्याची ती एक प्रयोगशाळा आहे, असं गुरुजी मानत. शिक्षकी व्यवसाय, पैसा कमविण्यासाठी अथवा दोन वेळच्या जेवणाची बेगमी होण्यासाठी त्यांनी स्वीकारलेला नव्हता. त्याकाळी पारतंत्र्यात असलेल्या देशाला स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशीचा महामंत्र देण्यासाठीच जणू गुरुजींनी, विद्यादानाचे कार्य हाती घेतले असावे.
गुरुजींनी पुण्याच्या न्यू पुना कॉलेजमधून १९२४ साली एम. ए. साठी ऍडमिशन घेऊन, द्वितीय श्रेणीत एम. ए. पूर्ण केले. १७ जून १९२४ साली अमळनेरच्या खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये, त्यांनी शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केली. १७ जुलै १९०८ साली स्थापन झालेल्या खानदेश एज्युकेशन सोसायटीने प्रथम विद्यामंदिर शाळा सुरू केली. ती कालांतराने १७ जुलै १९३४ साली प्रताप हायस्कूल म्हणून नावारूपाला आली. स्वातंत्र्याची आणि स्वदेशाची चळवळ या काळात जोरावर होती. त्याच्या परिणाम संस्था चालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांवरही झालेला होता. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुढे फार लौकिक मिळविल्याच्या नोंदी आहेत. साने गुरुजींची धडपडणारी मुले म्हणून ती प्रसिद्ध होती.
गुरुजींना मुलं आणि फुलं फार आवडत. मुलांच्या आणि फुलांच्या सानिध्यात प्रत्यक्ष परमेश्वराचा सहवास लाभतो, असा त्यांचा मानस होता. नवीन काही करावे, हा ध्यास त्यांच्या मनाला सतत पछाडून टाकी. त्या दृष्टीने शिक्षकी व्यवसायात त्यांच्या कर्तुत्वाला नवीन धुमारे फुटले. मुलांच्या निरागसतेतूनच त्यांना जीवनाचे धडे देण्याचे कार्य गुरुजींनी सुरू केले. प्रताप विद्यामंदिर फक्त शाळा न राहता, कर्मशाळा बनली. गुरुजी प्रताप विद्यामंदिरच्या वसतीगृहातच रहात. जे आजही आनंद भुवन म्हणून ओळखले जाते. प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना, या आनंद भुवन वसतीगृहात राहण्याचे भाग्य मला लाभले आहे. ज्या कर्मभूमीत गुरुजी राहिले, तेथली माती कपाळी लावताना अंगावर रोमांच उभे राहिले होते. जीवन कृतकृत्य झाल्याचे समाधान लाभले होते. पुढे शिक्षण संपल्यावर आयुष्यभर गुरुजींसारखं शिक्षण क्षेत्रात, मलाही ज्ञानदानाचे कार्य करता आले, हे मी माझे संचीत समजतो.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा गुरुजींचा स्थायीभाव होता. तो त्यांच्या वर्तनातून, वागण्या-बोलण्यातून, राहणीमानातून स्पष्टपणे दिसत असे. लांबकोट, काळी टोपी, ठसठशीत मिश्या आणि गळ्याभोवती उपरणे गुंडाळलेल्या गुरुजींची मूर्ती सात्विक वाटे. पायघोळ धोतर नेसलेले गुरुजी पुस्तकाविना सहसा दिसत नसत. अगदी प्रवासात देखील त्यांच्याजवळ पुस्तकं असत. गाडीत, रेल्वेत फार काय वेटिंग रूम मध्ये देखील, ते फावल्या वेळात पुस्तक वाचून, आपली ज्ञानाची तहान भागवीत असत. असा ज्ञानपीपासू व वेळेचे महत्त्व जाणणारा शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय व्हायला वेळ लागला नाही. गुरुजींनी लवकरच विद्यार्थ्यांची मने जिंकली होती.
शिक्षणशास्त्राचे कोणतेही शिक्षण घेतलेले नसताना, गुरुजींचे अध्यापन आदर्श होते. आदर्श शिक्षकांच्या अंगी असावेत, असे सारे गुण त्यांच्या ठाई होते. वर्गात शिकवताना गुरुजी कधीही खुर्चीत बसून शिकवत नसत. शिकवताना त्यांना पाठ्यपुस्तकाचीही गरज पडत नसे. कारण, विद्यार्थ्यांप्रमाणे ते स्वतः वर्गात शिकवायच्या विषयाचा सखोल अभ्यास घरुन करून येत. विषय शिकवतांना त्यांनी वेळेच्या आणि वेळापत्रकाच्या मर्यादेत स्वतःला मर्यादित करून घेतले नव्हते. एखादा विषय शिकवताना दुसऱ्या विषयाचा संदर्भ आला, तर ते त्या विषयावरही सर्वांकष चर्चा करीत. त्यांची माहिती व शिकवण्याची पद्धत इतकी अद्यावत असे, की विद्यार्थी तासंतास त्यांच्या शिकवण्यात मंत्रमुग्ध होत. पुढे गुरुजींचे अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर गेले. त्यांनी आपल्या आठवणीत लिहून ठेवलेले आहे की, गुरुजी आम्हाला शिकवत होते हे सांगताना आम्हाला फार अभिमान वाटतो. वर्गात शिकवताना धड्यातील कारुण्य प्रसंगांनी रडलेले गुरुजी त्यांना पाहता आले. गुरुजींनाही आपण शिकवलेल्या कारुण्य रसात साश्रूपूर्ण नेत्रांनी डुंबलेले विद्यार्थी पाहता आले. संवादाने मनामनाच्या तारा जुळवणारे धन्य ते गुरुजी आणी धन्य ते विद्यार्थी.
साने गुरुजींनी आपल्या व्यवसायात तन-मन धन अर्पण केले. कर्मज्ञान आणि त्यागाचा वसा घेतला. गांधी विचारांवर नितांत श्रद्धा ठेवली. यातूनच त्यांचे ओजस्वी, तेजस्वी व्यक्तिमत्वाला बहर आला. गुरुजींनी जीवनात संयम ,विवेक ,सेवा, प्रेम आणि सहकार्य यांना फार महत्त्व दिले. स्वच्छता, टापटीप आणि शिस्त त्यांना प्रिय होती. कोणतेही काम करण्यात त्यांनी कमीपणा वाटून घेतला नाही. त्यांनी मुलांवर आई सारखं प्रेम केलं. त्यांना मातृहृदयी शिक्षक ही ओळख मिळाली. यामुळेच विद्यार्थी व सहकार्यांमध्ये ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले.
शालेय अध्यापनाचे काम करत असतानाच गुरुजींवर छात्रालय प्रमुखांची जबाबदारी येऊन पडली. गुरुजींचा बहुतांशी वेळ विद्यार्थ्यांच्या सानिध्यात जात असे. गुरुजी, छात्रालयात असलेल्या विद्यार्थ्यांचे आई-बाप, भाऊ, मित्र होते. कोणत्याही वयाच्या विद्यार्थ्यांशी ते सहज संवाद साधत. त्यास आपलंस करून टाकत. छात्रालयात विद्यार्थी खऱ्या अर्थाने घडवता येतो, हे गुरुजींनी पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना मायेने स्वावलंबन, सचोटी, सहकार्य, स्वाभिमान, देशाभिमान व बंधुभाव या गोष्टी शिकविल्या. शिक्षक म्हणजे वेगळा प्राणी, असे ते समजत नसत. खोटी प्रतिष्ठा कुरवाळत बसण्यापेक्षा, मुलांमध्ये मुलांसारखे होऊन राहण्यात त्यांना आनंद वाटे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही त्यांच्याबद्दल उगाच भीती वाटत नसे. त्यांचे कार्यालय विद्यार्थ्यांनी सतत गजबजलेले राही. त्याकाळी शिक्षकांना विद्यार्थी दचकून असत. ती भीती गुरुजींनी सहज दूर केली होती.
छात्रालयात प्रभातसमयी, गुरुजी सर्वांना प्रेमाने उठवीत. त्यांना हवं नको ती चौकशी करीत. आजारी विद्यार्थ्यांची सेवा सुश्रुषा करीत. वेळप्रसंगी त्यांचे मल-मूत्रही आवरीत. मायच्या प्रेमाची पखरण करणाऱ्या शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांना प्रेम, आपुलकी, ममता वाटली नाही, तर नवलच नाही का ? मात्र, अशाही परिस्थितीत काही टार्गट, आळशी विद्यार्थीही असत. गुरुजी त्यांना शिक्षा न करता, त्यांची कामे स्वतः करून टाकीत. यातून विद्यार्थी वरमायचे, शरमायचे. मग ते गुरुजींची माफी मागत. अशाप्रकारे गुरुजी दगडातही देवपण आणीत असत. गुरुजी स्वतः कष्ट सोसत. स्वतःहून सर्वांना समजून घेत. समजून सांगत. यातून विद्यार्थ्यांमध्ये आपोआप सुधारणा दिसून येत असे. संयम हा गुरुजींचा महत्त्वाचा गुण. त्यामुळे आपल्या शिकवण्याच्या तात्काळ परिणामांची, त्यांना अपेक्षा नसे. ते वाट पाहायला तयार असत. मात्र, गुरुजी काही वेळा संतापत. संतापले म्हणजे त्यांच्या संताप वरच्या श्रेणीचा असे. अश्यावेळी ते स्वतःला शिक्षा करुन घेत. अबोला धरत. ही शिक्षा मुलांना सहन होत नसे. ते तात्काळ गुरुजींची माफी मागत.
विद्यार्थ्यांशी सर्वार्थाने एकरूप झाला, तोच खरा शिक्षक. असे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांची मनं वाचू शकतात. त्यांचा आनंद, त्यांचे दुःख, त्यांच्या अडचणी, आशा-अपेक्षा जाणून घेऊ शकतात. त्यावर उपायही करतात. त्यांच्या भविष्याला आकार देतात. साने गुरुजी असेच शिक्षक होते. त्यांनी अनेकांच्या अडचणी ओळखल्या. त्या सोडविल्या. कुणाच्या शाळेचे फी दरमहा भरली. कुणाच्या पुस्तकांचा खर्च उचलला. कित्येकांची जेवणाची सोय केली. अनेकांची प्रत्यक्ष सेवा केली. यासाठी, त्यांनी स्वतःच्या खर्चावर मर्यादा घातल्या. पोटाला चिमटा दिला. मात्र, कुणालाही हिरमुसलं होवू दिलं नाही. यामुळे, त्यांच्या पगारातील फार थोडा भागच त्यांच्या वाट्याला येई. त्यातही ते आनंदी राहत असत. त्यांचा आनंद भौतिक गोष्टींवर अवलंबून नव्हता. तो त्यांच्या स्वतःच्या मनाच्या निर्मळतेवर अवलंबून होता.
साने गुरुजी विद्यार्थ्यांवर वेगवेगळे प्रयोग करीत. शाळा आणि छात्रालय हे विद्यार्थ्यांना संस्कार आणि ज्ञानाची दीक्षा देणारी प्रयोगशाळा आहे, असे ते मानत. निसर्ग हा खरा शिक्षक असून, ज्ञानदानाचे कार्य चार भिंतीच्या वर्गात बसून करण्याचे काम नाही, अशीही त्यांची धारणा होती. नव्हे, तसा त्यांना विश्वास होता. म्हणून, वर्गात शिकवीत असतांना एखाद्या वेळी पाऊस सुरू झाला, तर ते शिकवणं थांबवून, मुलांना निसर्गाच्या वर्षाधारांच्या नृत्याविष्कार पाहायला मुक्त सोडू देत. त्यांच्या अशा वागण्यात कामचुकारपणा नव्हता. याची वरिष्ठांनाही कल्पना होती. गुरुजी जे करतील, ते चांगलेच करतील आणि त्यात विद्यार्थ्यांचे हितच दडलेले असेल, असा विश्वास त्यामागे असायचा.
शिकवत असतांनाच, गुरुजी विद्यार्थ्यांना समतेची शिकवण देत. अतिशय छोट्या छोट्या, साध्या साध्या प्रसंगातून महामंत्र देण्याची कला त्यांच्या ठाई होती. एखाद्या विद्यार्थ्याने आणलेला डबा अथवा खाऊ ते इतरांना वाटत. अशावेळी त्या निष्पाप लेकरांना जात-पात, धर्म, पंथ शिवू शकत नसे. आपला खाऊ दुसऱ्याला देण्यासाठी लागणारी मनाची विशालता, अशा प्रसंगातून गुरुजी विद्यार्थ्यांत निर्माण करीत. उच्च-निच्च हा भेदाभेद त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये येवू शकला नाही. जगात फक्त एकच धर्म असून तो फक्त प्रेम करणं शिकवतो, असं गुरुजी म्हणत. या उदात्त विचारातून त्यांच्या, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीन पददलीत, तया जावून उठवावे.! या प्रार्थनेचा जन्म झाला. त्यांच्या शाळेतील गड्यासाठी त्यांनी सोसलेले कष्ट, मुलांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले होते. त्याच्या अंत्यसमयी त्याला बंधू मानून गुरुजींनीच अग्नीडाग दिला. यापेक्षा विशाल बंधुप्रेमाचे उदाहरण मुलांना कुठे दिसणार होते. अशा दीपस्तंभासारख्या शिक्षकांची शिकवण, मुले कशी विसरतील. असे प्रसंग, अशा घटना विद्यार्थ्यांच्या मनःपटलावर प्रकाश टाकत. आणि अनपेक्षित पणे त्यांना दिव्य ज्ञानाचा लाभ होई. कृतीतून विद्यार्थी धडा शिकत. धन्य ते विद्यार्थी. धन्य ते शिक्षक. असा शिक्षक पुन्हा होणे नाही.
तो काळ स्वातंत्र्यसंग्रामाचा काळ होता. गुरुजींसारख्या सहनशील व्यक्तीलाही पारतंत्राची जोखड झुगाराविशी वाटत होती. त्यांना शाळा आणि छात्रालयाचे क्षेत्र मर्यादित व बंदिस्त वाटू लागले होते. स्वातंत्र्यलढ्यात आपणही खऱ्या अर्थाने सहभागी व्हावे, असे त्यांना वाटले. त्यांनी पूज्य बापूजींची आज्ञा आणि दिक्षा घेवून स्वातंत्रसंग्रामात उडी घेतली. २९ एप्रिल १९३० साली गुरुजींनी शाळा सोडली. ते स्वातंत्र्यसैनिक झाले. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. देशात शेतकऱ्यांचे राज्य यावे, असे त्यांना वाटे. देशात स्वातंत्र्याचे वारे वहात होते. सारा देश पेटून उठला होता. गुरुजींनीही आपली शब्दांची मशाल पेटवली. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, लावू पणाला प्राण.! असे सूर गुंजू लागले. विविध ठिकाणी सभा रंगू लागल्या. माणसं पेटू लागली. देशभक्तीने प्रेरित होऊ लागली. स्वातंत्र्यसंग्रामात झोकून देऊ लागली. यामागे उभी होती एक संयमीत, अबोल, अमोघ शक्ती. सेनानी साने गुरुजी. एका आदर्श शिक्षकाचे, एका राष्ट्रप्रेमी स्वातंत्र्यसैनिकात रूपांतर झाले होते. वेळप्रसंगी शिक्षकाला आपली भूमिका बदलवता आली पाहिजे, हेच गुरुजींनी आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिले.
♦️धन्यवाद : मा. हेमंतजी अलोणे आणि टिम देशदूत♦️
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव. जि. जळगाव.
~संकलन
आम्ही केलेलं चांगलं काम
चिन्मय बारी,कृष्णा बाविस्कर,लबिब शेख, हुजेफा खान, मनीष पाटील, रुद्र माळी |
कारगिल
चौकात सापडलेले ३२० रु./- परत केले
विद्यालयातील दर्शन
बडगुजर, सर्वेश जोशी, श्रीकांत चौधरी
या विद्यार्थ्यांना द्वितीय सत्र परीक्षेच्या कालावधीत ३२० रु/- सापडले ते त्यांनी
प्रामाणिकपणे शिक्षकांकडे जमा केले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी खूप छान काम केलंत. तुमचं चांगलं काम, सजगता, प्रामाणिकपणा या तुमच्या अंगभूत गुणांचा
तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल.
तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. तुमचं विवेकानंद
परिवारातर्फे खूप खूप कौतुक आणि हा चांगला
संस्कार तुमच्यात रुजवणार्या तुमच्या आई-बाबांचं व कुटुंबियांच मन:पूर्वक अभिनंदन
शुभेच्छांसह. तुमच्यासाठी या काव्यपंक्ती-
काम करण्यात गढून जा | गाणे गात रमून जा |