विवेकानंद विद्यालय,चोपडा तर्फे आभाळाचं दान कार्यक्रमातून कवी ना. धों.महानोरांना श्रद्धांजली . .
प्रतिनिधी, चोपडादिवंगत कविवर्य ना. धों.महानोर यांना श्रद्धांजलीपर ‘आभाळाचं दान अर्थात पाऊसगान' या पावसाच्या संकलित कवितांचा
कार्यक्रम विवेकानंद विद्यालयात आयोजित करण्यात आला. विलास पंढरीनाथ पाटील खेडीभोकरीकर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक जय श्री दादाजी हायस्कुल,तांदळवाडी) हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी महानोरांच्या रेखाचित्राचे पूजन करण्यात येऊन त्यांचा जीवनपरिचय उपशिक्षिका माधुरी हळपे यांनी विद्यार्थ्यांना करुन दिला व रानकवी स्व.ना. धों.महानोर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विद्यालयातील खालील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात पावसाच्या संकलित कविता व काही विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे अतिशय सुंदर गायन व अभिवाचन सादर केले.
कविता सादर करणारे विद्यार्थी
१)प्रांजल सानप (इ.५वी)-रिमझिम रिमझिम पाऊस बरसे...
२)नक्षत्रा सोनवणे (इ.५वी)-बूंदे...
३)आर्यदीप पाटील (इ.५वी)-स्व.ना.धो. महानोर यांची कविता
४)मनाली पाटील व जान्हवी चौधरी(इ.५वी) -अग्गोबाई ढग्गोबाई...
५)प्रियंका भोई (इ.६वी)-धोय धोय पाऊस...
६ ) आरोही पाटील ( इ . ५ वी ) ए आई, मला पावसात जाऊ दे
७)अनुष्का शिंदे (इ.६वी)-पाऊस आला...
८)कल्याणी पाटील व प्रांजल पाटील (इ.६वी) पावसाचे गाणे...
९ ))मुक्ता पाटील (इ.७वी)-पाऊस...
१०)रोहन पाटील (इ.७वी)-पाऊसधारा
११)वैष्णवी पाटील (इ.७वी)-पाऊस मस्तीतला..
१२)दीक्षा देशमुख (इ.७वी)-इंद्रधनुष्य
१३)स्वरा हरताळकर (इ.८वी)-पावसाची कविता
१४)साक्षी रायसिंग (इ.८वी)-पावसाची परी
१५)आर्या जोशी (इ.९वी)-हसरा नाचरा...
१६)सात्विक माळी (इ.९वी)-पाऊस आला...
१७)जैनब तडवी(इ.१०वी)-पाऊस म्हणजे नेमकं असतं तरी काय.?
१८)श्रुती देशमुख (इ.१०वी)-पाऊस
१९)प्रेरणा महाले(इ.१०वी)-पावसात भिजतांना...
तसेच प्रसाद वैद्य यांनी पाऊस ही स्वरचित कविता सादर केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विलास पाटील यांनी आपल्या संकलित आणि दिलखुलास पाऊस कविता सादरीकरणातून विद्यार्थ्यांना चिंब भिजवलं. दिवंगत कविवर्य ना. धों. महानोर यांच्या 'चिंब पावसानं रानं झालं आबादानी....'चा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. या सादरीकरणाच्या दरम्यान विद्यालयातील निवडक विद्यार्थ्यांनी कलाशिक्षक राकेश विसपुते यांच्या मार्गदर्शनाने पावसावर आधारित चित्र रेखाटले व रंगवले.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्याध्यापक श्री. नरेंद्र भावे यांनी विलास पाटील यांचे आभार मानले व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्मृती माळी व श्री. जितेंद्र देवरे यांनी तर श्री.विलास पाटील यांचा परिचय श्री. राधेश्याम पाटील यांनी करुन दिला. मुख्या . श्री. नरेंद्र भावे, श्री. पवन लाठी व सर्व शिक्षकवृंद याप्रसंगी उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर,अध्यक्ष डॉ.विजय पोतदार,उपाध्यक्ष घनश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त व पालकवृंद यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
No comments:
Post a Comment