विवेकानंद विद्यालयातील स्वरा हरताळकर व नक्षत्र कापुरे टि.म.वि.,पुणे आयोजित इंग्रजी लेखन कौशल्य व गणित परीक्षेत राज्यस्तरावर यशस्वी...
चोपडा (प्रतिनिधी)
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे आयोजित इंग्रजी, गणित व इतर परीक्षांचा निकाल (फेब्रुवारी 2024) नुकताच जाहीर झाला. त्यात विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थिनी स्वरा विनीत हरताळकर (इ.८वी) ही English Writing Skill या परीक्षेत १०० पैकी ९० गुण मिळवून राज्यात प्रथम, तर गणित परीक्षेत १०० पैकी ९६ गुण मिळवून राज्यात द्वितीय आलेली आहे. यापूर्वी दोन वेळा English Grammar परीक्षेत स्वरा हरताळकर हिने राज्यस्तरावर देदीप्यमान यश प्राप्त केले आहे. त्याचबरोबर नक्षत्र बाळकृष्ण कापुरे (इ.७वी) हा विद्यार्थी गणित या परीक्षेत १०० पैकी ९७ गुण मिळवून राज्यात द्वितीय आला आहे.
गेल्या १२ वर्षांपासून विवेकानंद विद्यालयात टिमवि इंग्रजी ग्रामर परीक्षांचे आयोजन केले जात आहे. त्यात आजवर सात विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर देदीप्यमान यश प्राप्त केले आहे. तसेच दोन वर्षांपासून टिमवि गणित परीक्षांचे आयोजन केले जात आहे. दोन्ही परीक्षेत राज्यस्तरावर यश प्राप्त केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.
English Writing Skill परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:
इयत्ता पाचवी
१)विहान अमोल मोदी (८१/१००)
२)मानस नरेंद्र पाटील (८१/१००)
३)गीत अमित हरताळकर (७५/१००)
४)नक्षत्रा योगेश सोनवणे (७५/१००)
५)मनाली प्रवीण पाटील (७२/१००)
६)रोहन गणेश सोनार (६०/१००)
इयत्ता सहावी
१)पर्वणी प्रसाद वैद्य (९४/१००)
२)रुचिका जितेंद्र पाटील (७८/१००)
३)दिशा शाम बडगुजर (७४/१००)
४)दूर्वा मिलिंद बाविस्कर (६६/१००)
५)कार्तिकी दीपक पाटील (६५/१००)
इयत्ता सातवी
१)तेजस रमेश चौधरी (६०/१००)
इयत्ता आठवी
१)सानवी अतुल पाटील (८८/१००)
२)तन्मय ज्ञानदेव दातीर (७२/१००)
English Conversation Skill या परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:
इयत्ता पाचवी
१)गीत अमित हरताळकर (७८/१००)
२)विहान अमोल मोदी (७६/१००)
३)मानस नरेंद्र पाटील (७३/१००)
४)नक्षत्रा योगेश सोनवणे (७१/१००)
५)रोहन गणेश सोनार (६३/१००)
इयत्ता सहावी
१)पर्वणी प्रसाद वैद्य (७६/१००)
२)कार्तिकी दीपक पाटील (७२/१००)
३)रुचिका जितेंद्र पाटील (७०/१००)
४)दूर्वा मिलिंद बाविस्कर (६६/१००)
इयत्ता सातवी
१)रोहन दिनेश चौधरी (७७/१००)
२)नक्षत्र बाळकृष्ण कापुरे (७५/१००)
३)तेजस रमेश चौधरी( (६७/१००)
४)वैष्णवी विनायक शिरसाठ (६४/१००)
इयत्ता आठवी
१)स्वरा विनीत हरताळकर (८६/१००)
२)सानवी अतुल पाटील (८३/१००)
गणित विषयाच्या परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:
इयत्ता पाचवी
१)विहान अमोल मोदी (९२/१००)
२)मनाली प्रवीण पाटील (९२/१००)
३)जान्हवी मनोज पवार(८०/१००)
४)जीनत जावेद तडवी (७७/१००)
५)पारवी रवींद्र पेंढारकर (७४/१००)
६)गीत अमित हरताळकर (७३/१००)
इयत्ता सहावी
१)पर्वणी प्रसाद वैद्य (९७/१००)
२)रुचिका जितेंद्र पाटील (९०/१००)
३)यज्ञेश भूपेश धनगर (७५/१००)
इयत्ता सातवी
१)नक्षत्र बाळकृष्ण कापुरे (९७/१००)
२)रोहन दिनेश चौधरी (९६/१००)
३)जिग्नेश अतुल पाटील (९२/१००)
४)सौम्या जुगलकिशोर पाटील (९०/१००)
५)तेजस रमेश चौधरी (८९/१००)
६)देवेन केशरलाल पाटील (८९/१००)
७)आर्यन दीपक पाटील (८९/१००)
८)गितेश ज्ञानेश्वर पाटील (८२/१००)
९)हर्षल जगदीश मराठे (७८/१००)
१०)श्रावणी सतीश पाटील (७६/१००)
११)वासुदेव यशवंत जाधव (७६/१००)
इयत्ता आठवी
१)स्वरा विनीत हरताळकर (९६/१००)
२)सुबोध अमृत पाटील (८९/१००)
३)सानवी अतुल पाटील (८८/१००)
४)हृतुजा किशोर पाटील(८३/१००)
५)काव्या रुपेश नेवे (७१/१००)
फेब्रुवारी महिन्यात या परीक्षा घेण्यात आल्या.
विद्यालयातील उपशिक्षक संदीप कुलकर्णी, हेमराज पाटील,प्रसाद वैद्य व विद्या सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी या विषयाचे तर सरला शिंदे, नूतन चौधरी, राजेश्वरी भालेराव व गौरव पाटील यांनी विद्यार्थ्यांना गणित या विषयाचे मार्गदर्शन केले.
या सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या आईबाबांचे, कुटुंबियांचे व सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, माजी अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, उपाध्यक्ष घनःश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक नरेंद्र भावे,शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद व पालकवृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.