चोपडा
सातपुड्याच्या कुशीत पहुडलेले, ऐतिहासिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, इ. अशी बहु मुखी ओळख असलेले अंकलेश्वर ते बुर्हाणपुर ह्या महामार्गावर व रत्नावती काठी वसलेले ते चोपडा.
एकेकाळी पाटील गढी, सुंदर गढी, मल्हार पुरा व मोठा देव्हारा अशा चार पाड्यात विभागलेले पण नंतर चार पाडे एकत्र येऊन चौपाडा व अपभ्रंश होऊन चोपडा म्हणून नावारूपाला आले. आज दुर्दैवाने या लेखातील काही गोष्टी अस्तित्वात नसतील ही. पण एके काळी चोपड्यचा इतिहास हा अति वैभवशाली नसला, तरी विविध परंपरांनी भरलेला होता.
अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, शत्रुघ्न सिन्हा, कांचीपुरमचे शंकराचार्य अशी नामवंत व्यक्तींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे.
चोपडा शहरात दोन यात्रा प्रामुख्याने प्रसिद्ध एक रथ यात्रा व दुसरी हरेश्र्वरची. परंपरेनुसार रथयात्रा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी काढली जाते. गोल मंदिर जवळिल मोठ्या बालाजी मंदिरापासून ही यात्रा सुरू होते. रथयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे रथारुढ श्री बालाजींना केळी प्रसाद रुपाने अर्पण करणे. व केळ्यांचाच प्रसाद जनतेला वितरण करण्यात येतो. यात्रा म्हणजे उत्साह....खाद्यपदार्थांचे स्टॉल... विविध वस्तूखरेदी.... झोके-पाळणे यात बसून आनंद घेणे. या यात्रेचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कितीही मौजमजा, खरेदी करा पण जर तुम्ही परत जाताना गोडशेव घेऊन गेला नाही तर यात्रेत सहभागी झाल्याचे समाधान नाही. कारण गोडशेव हे खानदेश मधील एक मिष्टान्न होतं, नाही अजूनही आहे, म्हणून तिचं महत्त्व मात्र नाकारता येणार नाही.आणखी एक, यात्रा म्हटली की हरेश्र्वरची. श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी भरणारी.हवेने भरलेले फुगे वा 'काकडी सदृश्य फुल्यांची नळी' एखादं पदक मिळाले असा आनंदात मिरवला जायचे. या जोडीला कर्कश्श आवाज करणार्याय पिपाण्या परिसर दणाणून सोडत. वेगळीच मजा होती ती! या हरेश्र्वरचे भाग्य वर्षभरात फक्त ह्या चार वा पाच दिवशी उजळायचे. एरवी फक्त सकाळी महादेवाला जलार्पण करणारे अन्यथा कोणी फारसे जात नसत.
भारतीय स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या काही लोकसभा निवडणुकीच्या वेळी चोपड्याचा समावेश धुळे मतदार संघात होता. श्री. चुडामण आनंदा पाटील हे दोन वेळा तात्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंच्या पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले होते. याची दखल घेत या घटनेचा उल्लेख स्वतः पंडितजींनी केला होता. नंतर पुनर्रचनेत एरंडोल लोकसभा मतदार संघात चोपड्याचा समावेश केला गेला. तेथूनच जनता पार्टीच्या झंझावातात सोनु सिंह पाटील निवडुन ही आले व गृहराज्यमंत्री झाले.सौ.शरद्चंद्रिकाअक्का पाटील यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात शिक्षण मंत्रालयआणि मा.श्रीअरूणभाई गुजराती यांनी नगर विकास व अर्थ असे महत्वाचे विभाग हाताळले आहेत.तसेच महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष पद ही भुषविले आहे. चोपडा म्हणजे अरुणभाई गुजराथी असं एक अलिखित समीकरणच बनले होते. चोपडा मतदार संघातून सलग चार वेळा निवडून आलेले ते एकमेव आमदार. मी ज्या वेळेस माझी ओळख चोपडेकर म्हणून देताच समोरची व्यक्ती अरुणभाईंच चोपडा का? अशी पृच्छा करतो.
चोपड्यामध्ये तसे सर्व राजकारणी व चोखंदळ आहेत. तासनतास राजकीय गप्पा झाडणे, आपले मत हिरीरीने मांडणे हा येथील लोकांचा आवडता छंद आहे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. नगरपालिका, खा. शि. मंडळ, पिपल्सअर्बन बँक, पंचायत समिती, जिल्हा परिषद... इ.ची निवडणूक म्हणजे आयते खाद्य!
चोपडा नगरपालिका ही सुद्धा एक फार जुनी स्थानिक स्वराज्य संस्था आहे.
चोपडा शहरातील पाटील गढी, सुंदर गढीचे बुरुज हे एक ऐतिहासिक शहर असल्याचं सांगत होते. आज त्याची अवस्था व खाणाखुणा जर्जरीत आहेत. कुणास ठाऊक! लोकांनी त्याच्या विटा पळवून नेल्या असाव्यात. ऐतिहासिक वास्तूंची जपणूक करण्याची आपली मानसिकताच नाही.
दानशूर, श्रीमंत प्रताप शेठजीं चोपड्याचे. पण चोपड्याला रेल्वे व त्याकाळी तापी नदीवर पुल नसल्याने त्यांनी अमळनेर येथे प्रताप मिल काढली. व पुढे प्रताप शाळा, काॅलेज काढली होती. अन्यथा ह्या सर्व गोष्टी चोपडा येथे असत्या व चोपडा हे जळगाव जिल्ह्यातील एक मोठे शहर म्हणून ओळखलं गेले असते, असो ह्या जर तरच्या गोष्टी. पण एक खरे दळणवळण नसल्याने चोपड्याची आर्थिक प्रगती वेग धरू शकली नाही.गांधी चौकात असलेले नगर वाचन मंदीर हे साहित्य व वाचन क्षेत्राची आवड असणार्यांोंसाठी फार मोठा आधारस्तंभ आहे. येथेच व्याख्यान माला आयोजित केली जाते. अनेक मोठ्या लेखकांची व्याख्याने मी अमरचंद सभागृहात ऐकली आहेत. साहित्य विषयक जाणीवा समृध्द होण्याचं ते फार मोठे साधन होतं. त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर मी ज्ञान व विचारधन याची बांधलेली शिदोरी अजून ही पुरत आहे. गांधी चौकात राजकीय सभा अनेक मोठमोठ्या नेत्यांनी गाजवलेल्या बघून अनुभवल्या आहेत. चोपडा हे शैक्षणिक क्षेत्रात उशिरा प्रसिद्ध झाले. शरद्चंद्रिका पाटील शिक्षण मंत्री झाल्यावर शिक्षण क्षेत्राला चालना मिळाली. जिल्हा परिषदेच्या ४ व एक खाजगी प्राथमिक शाळा, २ दोन माध्यमिक एवढ्यावर चोपड्याची शैक्षणिक तहान भागवण्यासाठी होती. प्रताप विद्या मंदिर सर्वात मोठी, जुनी शैक्षणिक संस्था. अनेक विद्यार्थ्यांनी येथून शिक्षण पूर्ण करून आपापल्या क्षेत्रात नाव कमावले आहे. पुणे बोर्डाच्या परीक्षेत मेरिट लिस्टमध्ये एखादा तरी विद्यार्थी असायचा व ते ऐकून पुर्ण चोपडा शहर गर्व अनुभव करीत असे. दुसरी म्युनिसिपल हायस्कूल, आपला खारीचा शिक्षण वाटा उचलत असे.संपूर्ण महाराष्ट्रात प्रताप विद्या मंदिरचे नाव अजूनही मानाने घेतले जाते. २००२ मध्ये ७ विद्यार्थी मेरीट लिस्ट मध्ये प्रताप विद्या मंदिरचे होते.
चोपडा काॅलेजचा विद्यार्थी म्हणून मिळणारा मान मी स्वतः अनुभवला आहे. चार दिवस भरगच्च कार्यक्रम असलेले गॅदरिंग हे एक इतर काॅलेजपेक्षा वेगळं वैशिष्ट्य असावं.
चोपडा येथे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम नाटकं हे प्रताप विद्या मंदिर प्रांगणात आयोजित करण्यात येत असे. सुलोचनाबाई चव्हाणांचा लावण्यांचा बहारदार कार्यक्रम आणि प्रमिला दातार यांचा 'सुनहरी यादे' हा ऑर्केस्ट्रा, झंकार यांची मजा काही औरच होती.
प्रायोगिक व व्यावसायिक नाटकांचाही सहभाग असे. त्याद्वारे मला येथे बऱ्याच मराठी नाटकांचा आस्वाद घेता आला. प्रभाकर पणशीकर, शरद तळवलकर, दादा कोंडके, निळू फुले, रंगनाथ कुलकर्णी अशा अनेक नामवंत कलाकार ह्या डोळ्यांनी पाहत त्यांची अभिनय कला मनात साठवली आहे.
या व्यतिरिक्त चोपडा शहराची इतर आणखी काही खास वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. त्यातील आता किती शिल्लक आहेत, हे चोपडा येथील रहिवासी मित्र सांगू शकतील.
श्रीराम नवमीला दुपारी बारा वाजता गांधी चौक येथील राम मंदिरात अलोट गर्दी व्हायची तर हनुमान जयंतीला तापीचा मारूती येथे हमखास गर्दी होत असे. सकाळी सकाळी सहा सात वाजता सायकल चालवत वाट बसने मारुतीचे दर्शन घेण्यासाठी भक्ती भावाने जाण्याची मजा बरेच जण घेत होती.
चोपडा शहरातील गांधी चौक जवळ फार जुनें एक मंदिर म्हणजे श्री रोकड बालाजी मंदिर. असं म्हणतात ह्याच मंदिरात चोपड्याचे श्रीमंत व्यक्ती प्रताप शेठ यांना बालाजींचे विशेष आशिर्वाद लाभले. त्यांनी दिलेल्या भरघोस रोकडा देणगीने नावारूपाला आले. असं म्हणतात येथे रोकडा फळ मिळते म्हणून
रोकड बालाजी असे नामकरण झाले. पण मंदिराचे ट्रस्टी श्री मोतीलाल महाराज यांचें अचानक तरुण पणी निधनानंतर पुढे भाऊबंदकी मध्ये अडकले व वाताहत झाली. चोपडा शहरातील पहिली प्रिटींग प्रेस व फोटो ग्राफी काढण्याचे श्रेय त्यांना म्हणजे श्री मोतीलाल महाराज यांना आहे.७०/७२ साली ११वीच्या बोर्डाच्या निकालाच्या आदल्या दिवशी वृत्त पत्र विक्रेते २५ पैसे देऊन निकाल पाहण्यासाठी गर्दी करत असु. नंतर ७३ पासून १० वीच्या निकाल एक रुपयात पाहून समाधान घेत. चांगला धंदा त्या एका दिवसात वृत्त पत्र विक्रेते करीत असे.
आशा व स्वस्तिक थिएटर हे चोपडा येथील चित्रपट करमणूक करणारी केंद्रे. हयांच्या समोरच्या दुकानात गरम भजी व नंतर सोडा पिऊन धन्य धन्य होता यायचं.गणेशोत्सव म्हटलं म्हणजे व्यापारी यांचा गणपती त्यांच्या वैशिष्ट्यांनी भरलेल्या डेकोरेशनसाठी प्रसिद्ध होते. बहुतेक वेळा पहिला मान विसर्जनाच्या मिरवणुकीत मिळत असे. चोपडा येथे गणेशोत्सव पाच दिवसांचा. विसर्जनाच्या मिरवणुकीत गुलालाची उधळण पुर्ण रस्ता गुलाबी
करायला पुरेसी होती.चोपडा हे जिल्ह्यातील पांचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. व्यावसायिक व व्यापारी केंद्र आहे. दादर म्हणजे रब्बी ज्वारी हे चोपडा परिसरात पिकणारं अतिशय स्वादिष्ट अन् कसदार धान्य. ज्वारीची भाकरी व कांद्या बरोबर हिरव्या मिरच्या चार ठेचा हा इथल्या शेतकऱ्यांचा शिदोरीचा अभिन्न हिस्सा. कपाशी ह्या पांढऱ्या सोन्याची म्हणजे नगदी पिकांची मोठी
बाजारपेठ आहे. शहरात आणि तालुक्यात दोन सुत गिरण्या आहेत. एकेकाळी २० च्या जवळपास जिनिंग व प्रेसींग तीन पाळ्यांमध्ये धडधडत.रविवारच्या आठवडे बाजारात वस्तु विकून चार पैसे गाठीला जोडलेले, सायंकाळी आपल्या खेडेगावी परतणारे शेतकरी, व्यापारी मंडळी तसेच खेडोपाड्यातून आठवड्याभराची खरेदीसाठी आलेली जनता पंजाबी चहा
पिऊन दिवसभरात आलेला थकवा घालवत असे. त्यातल्या त्यात मालापूर सम सातपुड्याच्या अंर्तगत भागात राहणारी पावरा अन् इतर आदिवासी त्यांच्या विशिष्ट पद्धतीचा , बाट्ट्या, आहडी, हाकूल अशा अलंकारांनी युक्त पेहराव आकर्षण निर्माण करत असे. पावरा नृत्य व संगीत आतातर चोपडा परिसरातील लग्न वा तत्सम कार्यक्रमात अनिवार्य आहे.आणखी काय काय लिहू? मला हे नक्की माहीत आहे की, चोपड्याची सर्वच वैशिष्ट्ये या लेखात आलेली नाहीतच. अजूनही अशी अनेक खास वैशिष्ट्ये असतील, जी मला माहीत नाहीत किंवा स्मृती पलीकडे गेल्या वाट लेख लिहिण्याच्या ओघात मागे पडली असतील.
जशी काही जुनी वैशिष्ट्ये नष्ट झाली असतील तशी काही नवीन निर्माणही झाली असतील.
एक मात्र नक्की, हे शब्द म्हणजे आठवणींच्या ढिगाऱ्यातून उपसून झाल्यावर लिहिलेल्या ओळी आहेत. बऱ्याच आठवणी काळाच्या ओघात नष्ट होऊन वाहून गेल्या असतील. पुन्हा एकदा भेट देउन अशा तीव्र आठवणी भावना मनात जाग्या होतील याची मला खात्री आहे.
आम्ही चोपडेकर आहोत' असा अभिमान पुणे करांसारखा ज्वाज्वल्य अभिमान बाळगायला हरकत नाही
![]() |
©ओमप्रकाश शर्मा |
~संकलन - प्रसाद वैद्य
"Madhavrao Gotu Patil", 28 varsh aamdar ( Chopda )👆यात बापूसाहेबा चा उल्लेख नाही लिहिण्यारयाला अपुर्ण माहीत आहे मार्केट कमेटी शेतकी संघ काॅलेज बापूसाहेब निर्माण केलंय..Bappuncha ullekhahi kela nahi......
ReplyDelete"28 varsh aamdar", sarkari davakhana, June bus stand, college, tapi pul , aani barach kahi .... 😞....... Bapunna ...The great PM Indira Gandhi n chya haste "Tamrpat " bhetale hote ,, Ajunahi aamhi te japun thevaley ,,,
Bapusaheb madhaorao gotu patil 28-30 varshya MLA MLC hote tyanchha karkirdit savkheda yethil tapi pul tasech Jalgaon jilhyat dusra cottage hospital chopdyala aanle maharashtryat chopda shetkari sangha 3 number chya aat hota, market committee, chopda college ,jilha bank, dudh vikas sangha, Ani 20 varshya Jalgaon jihad Ani tyanchya Saha tyanche 6 bhau freedom fighter hote ashya Mahan vyakti la apan visarlat he durdaiva ahe !!
ReplyDeleteTe chopda talukyache founder vyakti ahet
Narendra Patil - 9821383531
सन्माननीय वाचक,
ReplyDeleteआपल्या सूचनांचे स्वागतच आहे. परंतु एक गोष्ट नम्रपणे नमूद करु इच्छितो की हा लेख मी लिहिलेला नाही. चोपडा परिसर याबद्दल सदर लेख WhatsApp वर आला होता. हा लेख मला आवडल्यामुळे तो संग्रहित रहावा यासाठी माझ्या आवडीचा भाग म्हणून परिसराशी संबंधित फोटो Add करुन माझ्या Blog वर ठेवलेला आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही व लेखकाचाही तो नसावा असा माझा विश्वास आहे. सदर लेखकाचा व माझा प्रत्यक्ष परिचय वा संपर्क नाही. त्यांच्याशी संपर्क झाल्यास आपल्या भावना निश्चितपणे मी त्यांच्यापर्यंत पोहचवेल. आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
~प्रसाद वैद्य
९४२०११२२१५
Please lekhak kon aahe aamhala sanga kivva phone number 🙏 dyava , kivva aamchya bhavana lekhaka paryant pohachva ....
DeleteBapunche nav hetupurskar visarle aahet ase vatatey...😔
: तसे पाहिले तर कै. बापू साहेबांनी केलेल्या कामाची दखल आजपर्यंत कोणीही घेतली नाही. चोपडा शिक्षण मंडळाच्या प्रताप विद्या मंदिराला जी भव्य जागा आहे ती मा. बापुसाहेबांच्या प्रयत्नानेच मिळाली. परंतु त्यांना आजही योग्य प्रकारे मान मिळत नाही.
Delete: Ravindra kothari
Pune
स्वाती ताई,
Deleteआपण माझा चोपडा शहरातील माझ्या स्मरणात असलेल्या साठवणीतून शब्दात व्यक्त केलेला लेख वाचला त्याबद्दल आपले खुप खुप आभार.
श्री माधव गोटु पाटील उर्फ माधव बापू हे चोपडा नव्हे तर पुर्ण महाराष्ट्रातील मोठे व्यक्तीमत्व होते. ते जिल्हा काँग्रेस कमीटीच्या अध्यक्ष स्थानी होते. त्यांचा उल्लेख ह्या लेखाची सुधारीत आवृत्तीत निश्चितच करण्यात येईल.
सौ संध्या ताई पवार , श्री विठ्ठल गोटु पाटील यांच्या सुकन्या माझ्या चांगल्या परिचयात असून त्यांनी ही बाब लक्षात आणून दिली होती. असो.
आपण मला ८८८८८९६५०१
मो नंबर वर संपर्क करु शकता.
पुन्हा एकदा आभार
visit my blog omprakash25712@blogspot.com. and follow
ReplyDelete