मातृमंदिर विश्वस्त
संस्था आयोजित श्रमदान स्पर्धा २०२४
सहभाग-विवेकानंद
विद्यालय, चोपडा जि. जळगाव
श्रमकार्य
अहवाल
प्रस्तावना-
एरवी
विद्यालयातील विद्यार्थी विद्यालयात एक ते दोन तास श्रमदान करतच असतात परंतु
यावेळी त्याला मातृमंदिर
विश्वस्त संस्था आयोजित श्रमदान स्पर्धा २०२४ या स्पर्धेचे स्वरुप
लाभल्याने विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह दिसून आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक
श्री. नरेंद्र भावे यांनी अध्यापकांची सभा घेतली व विद्यार्थ्यांचे २५-२५ चे गट
तयार करुन एकूण १००विद्यार्थ्यांची निवड करण्याचे सांगितले व श्रमदान कोणकोणत्या
प्रकारे करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.आसपासच्या परिसरातील स्वच्छता हे
श्रमकार्य निवडण्यात आले. या स्पर्धेची मुख्य जबाबदारी विद्यालयातील उपशिक्षक
श्री. संदीप कुलकर्णी यांचेकडे सोपवण्यात आली. तसेच वर्गानुसार शिक्षकांचेही
गट तयार करण्यात आले. पर्यवेक्षक श्री.पवन लाठी यांनी यासाठी सहकार्य केले.
२) श्रमकार्य निवड स्वच्छता –
१)
हरेश्वर मंदिर,चोपडा या परिसराची स्वच्छता- गट क्र. १(इयत्ता६वी)
इयत्ता
६वीच्या गटाने हरेश्वर मंदिर परिसर निवडला. परिसरातील वाढलेले गवत व वाळलेली झाडांची पाने,जैविक कचरा याचे
प्रमाण जास्त असल्याने यांची साफ-सफाई करण्यात आली. या
गटाला अध्यापिका श्रीमती नूतन चौधरी व श्री जावेद तडवी यांनी मार्गदर्शन
केले.
२)
चोपडा बस स्थानक या परिसराची स्वच्छता- गट क्र. २(इयत्ता७वी)
इयत्ता
७ वीच्या गटाने चोपडा बस स्थानक हा परिसर
निवडला. परिसरातील कागद,प्लॅस्टिक,वाळलेली झाडांची पाने, यांची साफ-सफाई करण्यात आली. या गटाला अध्यापक श्री. जितेंद्र देवरे व श्री. राधेश्याम
पाटील यांनी मार्गदर्शन केले.
३)
विवेकानंद विद्यालय,चोपडा परिसराची स्वच्छता- गटक्र.३(इयत्ता८वी)
इयत्ता
८ वीच्या गटाने विवेकानंद विद्यालयाचा शालेय परिसर स्वच्छतेसाठी निवडला.
परिसरातील कागद,प्लॅस्टिक,वाळलेली झाडांची पाने, यांची साफ-सफाई करण्यात आली. या गटाला अध्यापक श्री.
अजय पाटील व सौ.स्मृति माळी यांनी मार्गदर्शन केले.
४)विवेकानंद
विद्यालय,चोपडा परिसराची स्वच्छता- गटक्र.४(इयत्ता९वी)
इयत्ता
९वीच्या गटाने विवेकानंद विद्यालयाचा शालेय परिसर स्वच्छतेसाठी निवडला. पूर्वतयारीसाठी
वर्गात विद्यार्थ्यांशी पंधरा ते वीस मिनिटे मार्गदर्शन संवाद साधण्यात आला.परिसरातील कागद,प्लॅस्टिक,वाळलेली झाडांची पाने, यांची साफ-सफाई करण्यात आली. मोठे डस्टबिन घनकचरा गोळा करून
मैदानाच्या शेवटी टाकीजवळ मोठ्या खड्ड्याजवळ टाकण्यात आला. शाळेचा आजुबाजुचा परिसर स्वच्छ केला व
रस्त्याच्या आजुबाजुला जमा झालेला कचरा गोळा करून त्याची व्यवस्थित विल्हेवाट
लावण्यात आली. या
गटाला अध्यापक श्री. हेमराज पाटील व
सौ.माधुरी हळपे यांनी मार्गदर्शन केले.
३)श्रमकार्याबद्दल विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद-
प्रत्यक्ष श्रमकार्यापूर्वी विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधण्यात आला. श्रमदानासाठी निवडलेले स्थान, श्रमाचे महत्त्व, त्यातून विद्यार्थ्यांना समाजाबद्दल, निसर्गाबद्दल निर्माण होणारी बांधिलकी,पर्यावरण संवर्धन व संरक्षण, स्वावलंबन, टीमवर्कचे महत्त्व या मुद्द्यांची चर्चा करण्यात आली. पालकांना हा उपक्रम खूप आवडला.
४)श्रमकार्य अतिशय उत्साहाने पार पडले. विद्यार्थ्यानी ‘श्रमेव जयते’ या उक्तीचा अनुभव या उपक्रमाद्वारे घेतला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक . या श्रमकार्यात विद्यार्थ्यांचे आई-बाबा व त्यांच्या कुटुंबियांचा नेहमीप्रमाणे मोलाचा सहयोग लाभला हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. मातृमंदिर विश्वस्त संस्थेने हा छान उपक्रम स्पर्धेच्या रुपाने राबविला त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद आणि आगामी उपक्रमांसाठी सस्नेह शुभेच्छा.!
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे दिलेल्या लिंकवर Click करा.
➤ समूह गायन व सूर्य नमस्कार स्पर्धा व्हिडिओ लिंक
![]() |
निकाल दि.०७/०२/२०२४ |
No comments:
Post a Comment