चोपडा दि.२१: येथील विवेकानंद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात ॐकार व प्रार्थना म्हणून सकाळी ५.४५ वाजता झाली. त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नरेंद्र भावे यांनी योग दिनाचे महत्त्व स्पष्ट केले आणि दैनंदिन जीवनात योगाचे फायदे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना विविध योगासने आणि प्राणायाम प्रकारांचे प्रात्यक्षिक दाखवले. यामध्ये वृक्षासन, भुजंगासन, शवासन, हस्तपादासन, उत्तान पादासन,त्रिकोणासन यांसारख्या सोप्या पण महत्त्वाच्या आसनांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सर्व सूचनांचे पालन करत योगासने केली. प्राणायामाचे महत्त्व आणि ते कसे करावे, याबद्दलही सविस्तर माहिती देण्यात आली.
योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास कशी मदत होते त्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले .सर्व विद्यार्थ्यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक छान सादर केल्याबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी सर्वांचे कौतुक केले. तसेच भविष्यातही अशी आरोग्यासाठी उपयुक्त असणारी योगासने नियमित करावीत असे आवाहन केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाभ्यासाविषयी जागरूकता निर्माण झाली आणि निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित झाले.
No comments:
Post a Comment