" अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन " विषयावर आधारित विवेकानंद विद्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न
चोपडा येथील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित, विवेकानंद विद्यालयात प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांसाठी दोन दिवसाचे प्रशिक्षण संपन्न झाले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणारे बदल लक्षात घेता शिक्षकही समृद्ध व्हावे यासाठी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हा विषय घेऊन शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. शिबिराचे उद्घाटन देवी सरस्वती व साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल, सचिव ड रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, विश्वस्त व मुख्याध्यापक नरेंद्र भावे, मुख्याध्यापिका आशा चित्ते, माधवी भावे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराचे प्रास्ताविक नरेंद्र भावे यांनी केले. डॉ. विकास हरताळकर यांनी सर्व शिक्षकांना शिबिर घेण्याचा उद्देश समजावत शुभेच्छा दिल्या.
पहिल्या दिवशी विद्यालय माझे देवाचे मंदिर हे गीत उपशिक्षिका वंदना वनारसे, माधुरी हळपे, नूतन चौधरी, ज्योती अडावदकर, वैशाली आढाव यांनी सादर केले. शुभांगी बोरसे यांनी शिक्षकांकडून नित्यस्मरण म्हणवून घेतले. पूर्व चाचणी शिक्षकांकडून सोडवून घेण्यात आली. पहिले सत्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची दिशा व अपेक्षा हा विषय घेत नरेंद्र भावे यांनी घेतले. ओमकार घेत दुसरे सत्र अध्ययन स्तर अध्ययन निष्पत्ती व एकविसाव्या शतकातील कौशल्य यावर पवन लाठी यांनी घेतले. तिसरे सत्र 21व्या शतकातील कौशल्यासाठी मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे, आव्हान देणे यावर जावेद तडवी यांनी घेतले.दुसऱ्या दिवशी विद्यापीठ गीत हे उपशिक्षिका ज्योती अडावदकर, वंदना वनारसे, शितल पाटील, राजेश्वरी भालेराव यांनी सादर केले. राधेश्याम पाटील यांनी शिक्षकांकडून नित्यस्मरण म्हणून घेतले. पहिले सत्र विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे, शिकण्याची गती वाढवणे व तंत्रज्ञानाचे उपयोग यावर जितेंद्र देवरे यांनी घेतले. दुसरे सत्र वर्ग व्यवस्थापनेतून अध्ययन व्हावे चैतन्यदायी यावर संजय सोनवणे यांनी घेतले. तिसरे सत्र नवोपक्रम व अध्ययन मोकळ्या तासिकेचे नियोजन व शिक्षण यावर नरेंद्र भावे यांनी घेतले.
समारोपाला झालेल्या प्रशिक्षणावर आधारित सर्व शिक्षकांची चाचणी परीक्षा घेतली. शिबिरासाठी आकर्षक रांगोळी, डिजिटल बॅनर व छायाचित्रण कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी केले. शिबिरात प्राथमिक व माध्यमिक विभागाचे चाळीस शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
No comments:
Post a Comment