पत्रास कारण की...
प्रियवर्ती वाचक,
सस्नेह नमस्कार.
विवेकानंद विद्यालयातील उपशिक्षक श्री.विजेंद्र महाजन सर यांनी इ. ६वी अ च्या वर्गात पत्रलेखन हा उपक्रम राबविला त्यात सुरुवातीला विद्यार्थ्यांना त्याबद्दल मार्गदर्शन केले व कच्चे काम म्हणून वहीत पत्रलेखन करवून घेतले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड पुरविले व आपले नातेवाईक, लेखक, कवी,साहित्यिक,खेळाडू किंवा विद्यार्थ्यांना ज्यांना पत्र पाठवावेसे वाटेल त्यांना पत्र पाठवावे असे सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने या छान उपक्रमात सहभाग घेतला.
![]() |
लेखिका प्रा. प्रभाजी बैकर (धुळे) यांचे कु. पर्वणी वैद्य या विद्यार्थिनीस आलेले पत्रोत्तर |
'चला हवा येऊ द्या...' यासारख्या
कार्यक्रमातील अरविंद जगताप यांनी सामाजिक जाणीवांवर लिहिलेली आणि सागर कारंडे यांनी पोस्टमन काकांच्या भूमिकेत आपल्या दर्दी आवाजात वाचलेली पत्रं प्रेक्षक, वाचक व श्रोत्यांना साद घालतात आणि कधी कधी तर डोळ्यांच्या कडा ओलांडायलाही भाग पाडतात म्हणूनच त्याला भरभरुन दादही मिळते.
श्री. विजेंद्र महाजन सर यांनी अतिशय सुंदर अशा उपक्रमाद्वारे चिमुकल्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रेरणा दिली, त्यांना लिहितं केलं ही स्तुत्य बाब आहे. त्याबद्दल सरांचं सहर्ष अभिनंदन आणि या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक तसेच त्यांच्या आईबाबांचं व कुटुंबियांचंही सहर्ष अभिनंदन. शुभेच्छांसह...!
~प्रसाद वैद्य
भ्रमणध्वनी- ९४२०११२२१५
(आपल्या प्रतिक्रिया Post a Comment Box मध्ये जरुर नोंदवाव्यात ही नम्र विनंती.)
No comments:
Post a Comment