माझी मोठी लेक कु.पर्वणी (इ.४ थी) हिने तिचे वर्गशिक्षक श्री. बारेला सर यांना लिहिलेलं हे पत्र. तिच्या आयुष्यातील हे पहिलं पत्र आणि तेही आम्ही दोघंही शाळेत गेलेलो असतांना कुणाच्याही मार्गदर्शनाशिवाय लिहिलंय हे विशेष. शाळेतून घरी आल्यावर तिनं हे पत्र मला दाखवलं. मला खूपच आनंद वाटला. म्हटलं बाळा, माझं जगणं तुझ्यात रुजलंय ग !
(आपल्या प्रतिक्रिया Comment Box मध्ये जरुर नोंदवाव्यात ही नम्र विनंती.)
या पत्राला आदरणीय बारेला सर यांचा प्रतिसाद
पर्वणी बेटा सर्वप्रथम तुझं मनःपूर्वक खूप खूप कौतुक...!!
कारण एक इ.४ ची ( साधारण दिड वर्ष कोरोनामुळे शाळेपासून दूर राहिलेली) विद्यार्थीनी एवढे सुंदर विचार एवढ्या सुंदर वाक्यरचनेमध्ये लिहु शकते म्हणून तसेच या इंटरनेटच्या युगात कालबाह्य होत चाललेला पत्रलेखनाचा तू छान प्रकारे छंद जोपासत आहे म्हणून ...शाब्बास पर्वणी..!👌👌🏻🍫🍫
आम्ही सर्व शिक्षक तुझ्यासारख्या एक वेगळ्या बुद्धिमत्तेच्या हुशार, समजदार, अष्टपैलू , विविध गुणसंपन्न विद्यार्थिनीला कसं विसरणार.तू जरी आता इ.५ वी ला जाशील पण आपली शाळा एकच आहे आणि आमच्यासारखेच तुम्हाला समजून घेणारे, उपक्रमशील, चांगले शिकवणारे शिक्षक तुला पुढील विभागातही लाभतील.तुम्ही जरी पुढील वर्गात गेलात तरी तुमचं कोणी केलेलं कौतुक, तुम्ही मिळवलेलं यश /बक्षीस याबद्दल तुमच्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला होतो.
आम्ही नक्कीच पर्वणी तुझ्यासारख्या विद्यार्थिनीला मिस करू.तुझ्या पत्र लेखनातून असे दिसून आले की, तू मिळविलेल्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनात चांगल्या प्रकारे उपयोग करत आहेस याचा मला अभिमान वाटतोय. छान.. तू खूप मोठी हो बेटा,आईबाबांचं नाव खूप मोठं कर.तू मला लिहलेले वरील पत्र नेहमी मला माझ्या कामात प्रेरणादायी ठरत राहील तसेच मला अधिक जोमाने, उत्साहाने काम करण्याचे बळ देत राहील वआयुष्यभर माझ्या स्मरणात राहील.
पर्वणी तुला पुढील वाटचालीस अनेकोत्तम शुभेच्छा...!!👍👍🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
श्री. बारेला सर
विवेकानंद विद्यालय, चोपडा.
अप्रतिम ....👍👍👍👍👌 सर , खूप सुंदर लिहिल आहे पर्वणीने . हस्ताक्षर तर फारच उत्कृष्ट आहे . मी घरी पालकांना सांगितलं की , ओळखा कितवीच्या विद्यार्थीनीच अक्षर
ReplyDeleteआहे तर ते बोल्ले असेल 6 वी , 7 वी च😊😊 ते खूप चकित झाले . तिने कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय खूप सुरेख पत्र लिहिलं आहे. तिची कल्पना शक्ती , भाषाशैली ..... अगदीच लाजवाब👍👍✨ आम्ही देखील ४ थीत एवढे हुशार व creative नव्हतो😀 हे पत्र वाचल्यावर व तुम्ही आम्हांला सांगितलेल्या पर्वणीच्या गोष्टींवरून मला हे समजत नाहीये की काय म्हणू , पर्वणी तुमची मुलगी आहे की तुम्ही पर्वणीचे पालक आहात.
भविष्यात पर्वणी नक्कीच खूप काही तरी वेगळं achieve करेल . Keep it up my little sister....👍👍go ahead...👍✨
Thank you very much,Mayuri.
ReplyDelete