दुर्दम्य आत्मविश्वास म्हणजे दुर्गेश !
शालांत परीक्षेत मिळवले ९१.८०%
कोलंबस चे गर्व गीत या कवितेत कुसुमाग्रज सागराला उद्देशून कोलंबसच्या मुखी काव्यपंक्ती देतांना लिहितात की अनंत आमची ध्येयशक्ति अनंत अन आशा किनारा तुला पामराला
अर्थात सागराची मर्यादा किनारा आहे परंतु,माणसाच्या ध्येयशक्तिला दाही दिशा मोकळ्या आहेत.
या उपरोक्त काव्यपंक्ती महात्मा गांधी शिक्षण मंडळ,चोपडा संचलित कला,शास्र व वाणिज्य महाविद्यालयात विनाअनुदानित तत्वावर शिपाई पदावर कार्यरत श्री.विजय मनोहर शुक्ल यांचा लाडका सुपुत्र दुर्गेशला अगदी तंतोतंत लागू पडतात.
नियतीने घाला घातला. गणेश विसर्जन मिरवणुकीत पाच वर्षांपूर्वी दुर्गेश च्या हातातील स्टील दांडा असलेला ध्वज उच्च दाबाच्या विद्युत तारांना लागून मोठा अपघात झाला. त्यात त्याचे हात व पाय यांना जबर जखमा झाल्याने शरीरापासून हात पाय विलग करावे लागलेत.
देवाच्या मूर्तीला विसर्जित करतांना जरी अपघात झाला असला तरी अनेक माणसातील देव त्याच्या मदतीला धावून आलेत.
दुर्गेशने अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिली आणि तो मृत्युंजय ठरला! त्याचा उत्साह तिळमात्र ढळला नाही तो निराश हताश झाला नाही.
मी अनेकदा त्याला भेटलो पण त्याच्या चेहऱ्यावर अवयव गमावल्याचे दुःख दिसले नाही.
त्याचे वडील कार्यरत आहेत तो चोपड्यातील महात्मा गांधी शिक्षण मंडळ परिवार व त्याची आजीने सेवा दिलेला तसेच आई कार्यरत असलेले विवेकानंद विद्यालय व हॉस्पिटल परिवार शुक्ल परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत.
विकासकाका हरताळकर व त्यांच्या पूर्ण परिवाराच्या मार्गदर्शनखाली दुर्गेशवर उपचार झालेत त्याला कृत्रिम अवयव मिळालेत.आणि त्याने नुकत्याच जाहीर झालेल्या शालांत परीक्षेत मानस विनीत हरताळकर याला रायटर घेऊन आभाळव्यापी यश मिळवलं.
विवेकानंद विद्यालयात त्याच्या या यशाचं मुख्याध्यापक श्री.नरेंद्र भावे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी कौतुक करून आनंद साजरा केला.
दुर्गेशच्या लढ्यात त्याचे आई वडील श्री.विजय शुक्ल व सौ.जया शुक्ल तसेच आजी सरोज शुक्ल यांचा खूप मोठा वाटा आहे.
दोघांनी विनाअनुदानित तत्त्वावरील नौकरी करत बेताची आर्थिक परिस्थिती असतांना जिद्दी व चिकाटी ठेवत स्वतःला व मुलाला एवढ्या मोठ्या अपघातून सावरलं याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
शुक्ल परिवाराच्या धैर्यशीलतेला व दुर्गेशला मदत करणाऱ्यांना सलाम व दुर्गेशबाळाचे
लाख लाख अभिनंदन!
प्रा.संदीप भास्कर पाटील
आदर्शगाव वडगावकर
***************
आदरणीय संदीप पाटील सर,😊👏
आपलं चि.दुर्गेशबद्दल हे दुसरं आणि बोलकं लिखाण खरंतर पावती आहे त्याच्या सकारात्मक ऊर्जा आणि जिद्दीची. ही कौतुकाची थाप त्याच्यासह आमच्यासाठीसुद्धा प्रेरणादायी आहे. देणाऱ्याने देत जावे हा भाव जपणारी, संवेदनशील,सहृदय आणि सजग माणसं सोबतीला असली की, संघर्षसुद्धा समृद्धीची अनुभूती देतो. याची प्रचिती श्री. विजयभाऊ व सौ. जयाताई यांनाही आली असावी याची खात्री आहे. शुभेच्छा. भेटुया.
📘📚📖📋✍🏻
~प्रसाद वैद्य व परिवार
No comments:
Post a Comment