My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Sunday, 26 May 2024

मानवी मूल्यांचा नंदादीप-कस्तुरीगंध

 संकलन- प्रसाद वैद्य

[1:12 pm, 26/05/2024]

Prasad Suresh Vaidya: 

आदरणीय मनीषा ताई,😊👏

सस्नेह नमस्कार.

दैनिक गावकरी आस्वाद (दि.२६ मे २०२४) यातील 'मानवी मूल्यांचा नंदादीप-कस्तुरीगंध' हे प्रा. बी. एन. चौधरी लिखित पुस्तकाचा परिचय करुन देणारं आपलं परीक्षण वाचलं. सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपण इतक्या छान शब्दांत पुस्तकातील कथांचं वर्णन केलंय की वाचकाला हे पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाटेलच परंतु हा लेख वाचूनच ते पुस्तक वाचल्याचा अनुभव यावा. मूळात चौधरी सर म्हणजे साहित्याच्या सर्व प्रांतात मुक्त विहार करणारा संवेदनशील आणि चोखंदळ लेखक/ कवी असंच मी म्हणेन. तसा उल्लेख आपणही या लेखाच्या सुरुवातीला केलाय. 

अतिशय सहज आणि समर्पक शब्दात आपण या पुस्तकाचं खूप सुंदररीतीने परीक्षण केलंय. संवेदनशील, काळजाला  भिडणाऱ्या लेखनाला आवर्जून दाद द्यावीशी वाटली. म्हणूनच आपलं सहर्ष अभिनंदन. आपल्या आगामी लेखन कार्याला व उपक्रमांना सस्नेह शुभेच्छा.

📙📚📖📋✍🏻

~प्रसाद वैद्य 

चोपडा जि.जळगाव 

📱९४२०११२२१५

[2:03 pm, 26/05/2024] 

मनीषा कुलकर्णी/आष्टीकर: 

प्रसादजी ,

किती सुंदर अभिप्राय दिलात तुम्ही.मनापासून आभार.खरंतर असे प्रेरणादायी अभिप्राय वाचन आणि लेखनास बळ देतात.

तुम्ही एक उत्तम वाचक आहात याची खात्री पटते.

[7:56 pm, 26/05/2024] 

प्रा. बी. एन. चौधरी:

प्रसादजी शुभ संध्या.

आपला अभिप्राय मनभावन आहे. आपण या समिक्षणाला आपल्या ब्लॉगवर प्रसिध्दी देवून याचे उचित मुल्यमापन केले आहे. धन्यवाद.! 

मनिषाताईंनी केलेलं आस्वादक समिक्षण ही संग्रहाला मिळालेली रसिकतेची पावती आहे. खरतर, यापुर्वी त्यांची आणि माझी ओळखही नव्हती.

खरंतर, लेखक धरणगावचा, प्रकाशक पुण्याचे, समिक्षिका परभणीच्या आणि लेखन प्रकाशित झालं ते दैनिक नाशिकचं. हा निखळ मैत्रीचा चतुष्कोण आहे. हीच आपली श्रीमंती.!\

ब्लॉगवर प्रतिक्रिया नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य होत नाही. ऋणातच राहतो. 

🌷🌷🌷🙏🌷🌷🌷

देवरुप परिवार, धरणगाव.

1 comment:

  1. लेखक व दैनिक गावकरी वर्तमानपत्र (खान्देश), प्रकाशक (प.महाराष्ट्र), समीक्षक (मराठवाडा) आणि वाचक (अवघा महाराष्ट्र +...)या साऱ्या गोष्टींचा चतुरंग चतुष्कोन आणि संगम साधणारा एक छान लेख व कथासंग्रह. प्रत्येक वाचकाने नक्कीच वाचू या. शुभेच्छा...भेटू या.

    ReplyDelete