My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Tuesday, 10 October 2023

विवेकानंद विद्यालयात 'घडताना बिघडतांना' हा प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न

विवेकानंद विद्यालयात 'घडताना बिघडतांना' हा प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी, चोपडा दि. ३ ऑक्टोबर २०२३
येथील विवेकानंद विद्यालयात Smarter तयारी अभ्यासाची या उपक्रमा अंतर्गत आयोजित 'घडताना बिघडतांना' हा इयत्ता ९वी व १०वी चे विद्यार्थी व पालक यांच्यासाठी खास असलेला कार्यक्रम संपन्न झाला.   
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे सादरकर्ते श्री.संजय विद्या विष्णू गोविलकर व डाॅ.विकास हरताळकर,ॲड. रवींद्र जैन,डाॅ.विनीत हरताळकर, श्री नरेंद्र भावे व मान्यवर यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  व प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री.नरेंद्र भावे यांनी केले. 
डाॅ. विकास हरताळकर यांच्या हस्ते श्री. संजय  विद्या विष्णू गोविलकर यांचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर वक्ते श्री.गोविलकर यांनी वेळेचे नियोजन,संवाद कौशल्यांचा विकास,योग्य ध्येयनिश्चिती,सतत नवीन 
शिकण्याचा ध्यास,उत्तम आरोग्य,आर्थिक नियोजन, ताण-तणाव नियोजन या संदर्भात विद्यार्थ्यांशी व पालकांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले. त्याचबरोबर या मुद्द्यांवर आधारित संकल्पासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक छानसे कार्ड भेट दिले.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांमधून अवनी वानखेडे हिने आपले मनोगत व्यक्त केले. तसेच उपस्थितांपैकी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. विकास हरताळकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. पवन लाठी यांनी केले.कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम 
ने करण्यात आली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, विश्वस्त व मुख्याध्यापक श्री. नरेंद्र भावे, प्राचार्या सौ.सुरेखा मिस्तरी, मुख्याध्यापिका श्रीमती आशा चित्ते यांच्यासह विद्यालयातील इयत्ता नववी व दहावीचे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक, शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















No comments:

Post a Comment