पुणे नगर वाचन मंदिराच्या अनेक उपक्रमांतून उद्याचे साहित्यिक घडतील- डॉ. चित्रलेखा पुरंदरे
राज्यस्तरीय निबंध स्पर्धा , कथा लेखन स्पर्धा व अलक लेखन स्पर्धा यांचा पारितोषिक वितरण सोहळा
पुणे : वाचक आणि लेखक घडवण्याचे मोठे काम पुणे नगर वाचन मंदिर करत आहे. नगर वाचनच्या अशा उपक्रमांमुळे अनेक तरुण लेखक निर्माण होतील. वैभवशाली साहित्य परंपरा जपण्याचे व पुढे नेण्याचे महत्त्वाचे काम ही संस्था करत आहे, असे मत जेष्ठ लेखिका डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी व्यक्त केले.
पुणे नगर वाचन मंदिरातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धा , कथा लेखन स्पर्धा व अलक लेखन स्पर्धा यांचा पारितोषिक वितरण सोहळा डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी लोकसाधना संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजा दांडेकर हे उपस्थित होते. या समारंभात ‘पुनवा’ या संस्थेने प्रकाशित केलेल्या दिवाळी अंकाचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे, कार्यवाह सुवर्णा जोगळेकर , लोकसाधना संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजा दांडेकर व सचिव कैवल्य दांडेकर उपस्थित होते.
ग्रामीण भागात आजही प्रतिभावान लेखक असून त्या लेखकांच्या शब्दांना अंधारातून प्रकाशाकडे आणण्याचे काम पुणे नगर वाचन मंदिर करत आहे , अशी भावना डॉ. राजा दांडेकर यांनी व्यक्त केली.
पुणे नगर वाचन मंदिर, पुणे व लोकसाधना, चिखलगाव यांच्या सहयोगाने ‘उपयोजित लेखन कौशल्य विकास प्रकल्पाचे’ उद्घाटन आज लोकसाधनेच्या शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभिनव कार्यक्रमातून करण्यात आले. या प्रकल्पाची सुरुवात पाच छोट्या विद्यार्थी लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रकाशनाने झाली. श्रेया दुबळे , पल्लवी कासेकर , कणाद दांडेकर , श्रावणी बारे , आर्या पतंगे या विद्यार्थी लेखकांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.
अलका कोठावडे , नीलम क्षत्रिय , मनाली ओक , नीता इनामदार , नीता गोडबोले ,राहुल जोशी , विनया साठे , किशोर करंजकर , भारती पांडे , पार्थ जोशी , साधना झोपे , अभिजित जोगळेकर , नेहा उजाळे , अरुणा गर्जे , प्रणाली सावंत , रंजना शर्मा , कल्याणी जोशी , नारायणी कांबळे , स्वस्ती बोरकर , पर्वणी वैद्य , काव्या दांडेकर , अथर्व पाटील , स्नेहल देवकाते , तन्वी गुडेवार , संस्कृती दौंडकर , यशोधन इनामदार , प्राजक्ता जाधव , सुश्रुत बारड , नेहा पाटील या विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पुणे नगर वाचन मंदिराचे सर्व पदाधिकारी व कार्यकारी मंडळ सदस्य उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाच्या समन्वयाची जबाबदारी कार्यकारिणी सदस्य स्वाती ताडफळे यांनी पार पाडली. डॉ. प्रसाद जोशी यांनी आभार मानले व डॉ. गायत्री सावंत यांनी सूत्रसंचालन केले.
No comments:
Post a Comment