कु. लीना नितीन सोनवणे (इ.१० वी) हीच बोलकं शुभेच्छापत्र - खरंतर माझ्यासाठी 'रिटर्न गिफ्ट...'
आदरणीय सर,
तुम्हालाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏😊
सर दिवाळीत अनेक गोष्टींचं वाट पहाणं असतं आणि त्यातील एक म्हणजे तुमच्या शुभेच्छा पत्रांचं. सर तुमच्या अनेक उपक्रमांमधील हा एक आगळावेगळा उपक्रम आहे, ज्यात तुम्ही आम्हांला शुभेच्छांबरोबर मोलाचा संदेशही देतात. गेली दोन वर्षे लॉक डाऊनमुळे तुमची शुभेच्छापत्र प्रत्यक्ष आमच्या पर्यंत पोहोचली नाहीत, त्यामुळे या वर्षी ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती आणि फाईनली शेवटच्या दिवशी पत्रे मिळाली आणि आम्हांला खुप आनंद झाला कारण हे आमचं शाळेतील शेवटचं वर्ष आहे त्यामुळे हे आमचं शाळेतील शेवटचं दिवाळी शुभेच्छा पत्र म्हणायला हरकत नाही. सर मी ही पत्रे कायम माझ्या संग्रही ठेवेल. आपल्या शाळेतील अश्या उपक्रमांमधून नेहमीचं आम्हांला काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळत असते. पुन्हा तुम्हांला, पुनम टिचराना आणि माझ्या दोघही लहान बहीणींना ( मनू , निर्मिती) दिवाळीच्या शुभेच्छा 💐🪔🎊
_________________________________________________________
कु. लीना,😊
"शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसंच पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात...बाकी सारं नश्वर आहे." या विचारावर माझा अभंग विश्वास आहे. त्यामुळेच मनात आलेल्या चांगल्या विचाराला पटकन कृतीची जोड देऊन मोकळं होणं मला आवडतं. यामुळेच मला मोठ्या लेखकांची पत्रोत्तरं येण्याचं आणि काहींची भेट घेण्याचं भाग्य लाभलं हे नमूद करतांना विशेष आनंद वाटतो. (मध्यंतरीच्या काळात यात सातत्य नाही राखता आलं याच वाईट वाटतं.)आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचीही तुझ्यासारखी बोलकी पत्रं आलीयेत जो माझा आनंद द्विगुणीत करतात. तुझ्या संग्रही ही सारी शुभेच्छापत्रं आहेत या गोष्टीचाही विशेष आनंद वाटला. या संग्रहात तुझे आई-बाबां,मावशी आणि कुटुंबियांचाही तुम्हां दोघींच्या संगोपनातील संस्कार दडलेला आहे हीदेखील जमेची बाजू आहे. याबद्दल मानसी हिच्याही इ.४थीतील काही बोलक्या आठवणी मला ऊर्जा देतात. पुनश्च तुम्हां सर्वांना दीपावलीच्या सस्नेह शुभेच्छा. (तू एक चांगली वाचक,उत्तम वक्ता,दर्दी श्रोता,उत्साही तबलावादक, सुजाण रसिक आहेस म्हणून तुझ्यासाठी यावर्षी शुभेच्छापत्रावर असलेल्या प्रार्थनेच्या अर्थाची लिंक Share करतोय. हा अर्थ अवश्य वाचावा. हीच प्रार्थना आमच्या वर्गात परिपाठाच्यावेळी आम्ही म्हणतो.)
शुभेच्छा भेटू या.
🌺🌸🌺🌸🌺 🏮🪔🪔🪔🪔🪔🪔📘📚📖📋✍🏻
~प्रसाद वैद्य व परिवार
No comments:
Post a Comment