My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Monday, 12 February 2024

करिअर निवडतांना प्लॅन बी तयार असू द्यावा: डाॅ.अमित हरताळकर

करिअर निवडतांना प्लॅन बी तयार असू द्यावा: डाॅ.अमित हरताळकर

दि.११ फेब्रुवारी  
चोपडा (प्रतिनिधी)
आपण आपल्याच चूकांतून कधीतरी  शिकतो. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' या उक्तीनुसार इतरांच्या चूकांतून शिकणं यालाच आजच्या काळात Smartness म्हणतात. दहावी-बारावीनंतर आपले करिअर निवडताना आपल्याला हवे ते क्षेत्र निश्चित निवडावे परंतु त्यापूर्वी त्याक्षेत्रात आपल्याला यश मिळाले नाही तर आपला प्लॅन बी तयार असू द्यावा असे मत हरताळकर हाॅस्पिटलचे संचालक  डाॅ.अमित हरताळकर यांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना व्यक्त केले. 
चोपडा येथील विवेकानंद विद्यालयात दहावीचा निरोप समारंभ भावनिक वातावरणात संपन्न झाला. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख पाहुणे व संस्थेचे विश्वस्त डाॅ.अमित हरताळकर व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. 
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नरेंद्र भावे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर  चैतन्य पाटील,जैनब तडवी, सत्यम सोनवणे, तनीष लाठी, लतिका निकम,अवनी वानखेडे, तेजस्विनी पाटील या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या बालांगणापासून तर दहावीपर्यंतचे अनुभव व्यक्त करुन आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. उपस्थित सर्व याप्रसंगी हळवे झाले होते. 
शिक्षकांमधून संदीप कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. 
विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना डाॅ.अमित हरताळकर म्हणाले की मी तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करायला आलेलो नसून  तुमच्याशी गप्पा मारायला आलोय. मी तुमच्या वयात असताना माझ्याकडून ज्या चूका झाल्या त्या तुमच्याकडून होऊ नये यासाठी तुम्हाला काय करता येईल हे तुम्हाला सीनियर म्हणून सांगायला आलोय. दिलखुलास संवाद साधताना त्यांनी त्यांच्या  आयुष्यातील स्वतःचे व काही मित्र-मैत्रिणींचे अनुभव सांगितले. तसेच योग्यवेळी भावनांचा आदर करावा परंतु भावनांच्या आहारी जाऊ नये. आपला आनंद कशात आहे त्यानुसार आपल्याला करिअर निवडता यायला हवे. समाज काय म्हणेल यापेक्षा आपल्याला स्वतःला काय वाटते व काय साध्य करता येईल याचा विचार करावा. हे नमूद करतांना त्यांनी त्यांच्या एका मित्राचे उदाहरण सांगितले. आपल्या संवादी शैलीने त्यांनी सर्व विद्यार्थ्यांची मने जिंकली. जेव्हा केव्हा अडचणी आल्या आणि गप्पा माराव्याश्या वाटल्या तर नक्कीच माझ्यासोबत गप्पा मारायला यावे असे सांगून सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कुलकर्णी यांनी, पाहुण्यांचा परिचय श्री. पवन लाठी यांनी तर आभार श्री. जावेद तडवी यांनी मानले.  
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष  डाॅ.विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डाॅ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष श्री.घनश्यामभाई अग्रवाल,सचिव ॲड. रवींद्र जैन, मुख्याध्यापक श्री.नरेंद्र भावे,श्रीमती आशा चित्ते,प्राचार्य श्री.पी.जी पाटील,सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व दहावी-बारावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.



बातमीची लिंक Lok प्रवाह

Thursday, 25 January 2024

हरताळकर हॉस्पिटल ब्लड स्टोरेज सेंटर


घोडगाव येथील साने गुरुजी वाचनालयास डॉ.विकास हरताळकर यांनी दिली पुस्तके भेट...

 घोडगाव येथील साने गुरुजी वाचनालयास डॉ.विकास हरताळकर यांनी दिली पुस्तके भेट...

घोडगाव ता चोपडा येथील साने गुरुजी वाचनालयास चोपडा येथील सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉ. विकास हरताळकर यांनी आज सदिच्छा भेट देऊन ५०० पुस्तके भेट दिली. या प्रसंगी त्यांचा सत्कार वाचनालयाचे ग्रंथपाल विजय दामोदर कोळी यांनी केला.या छोटेखानी समारंभात वाचनालयाचे चिटणीस विठ्ठल पुंडलिक पाटील यांनी प्रास्ताविक केले.वाचनालय चे अध्यक्ष प्रा. प्रदीप लिंबा पाटील यांनी आभार मानलेया प्रसंगी माजी सरपंच दिलीप कोळी, नरेंद्र विसपुते, ग्राम पंचायत सदस्य सुनील कोळी, युवराज रहाते, विजय न्हावी, चेतन बाविस्कर, विठ्ठल कोळी, संदीप पाटील, छोटू सोनार, भवरलाल जैन, बापू कोळी, हजर होते.






Friday, 19 January 2024

भगवंताची मिठी

 भगवंताची  मिठी . . ...  

भगवंताचं होणं ....... सोप्प नसतं हो भगवंताचं होणं... प्रचंङ निरागसता लागते... स्वच्छ मन लागतं. .

तुम्ही कधी भगवंताला मिठीत घेतलय का..?

नाही ना..... 

कधी सहज म्हणुन कुणाला निरपेक्ष मदत केलीए का? करून बघा.... भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल..

अतिव दुःखात कुणाला आधार दिलाय का? देऊन बघा..... भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल..

कुणाच्या उर्त्कषाचं कारण व्हा....... कुणाच्या यशात भक्कम साथ द्या....... भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल..

कुणी कुणाचं नसतं हो..... तरीही कुणाचंतरी व्हायला काय हरकत आहे? आई नसलेल्याची आई व्हा..... कुणाची ताई व्हा...... कुणाचा बाप व्हा तर कुणाचा भाऊ.... मग बघा.... भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल..

कुणाच्या चेहर्यावरचं हास्य बना..... कुणाचे अश्रूंनी तुङुंब भरलेले डोळे पुसा.... मग, बघा.. भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल..

वार्धक्याने थकलेल्या पायांना तुमच्या हातांची ऊब द्या..... थरथर कापणारे हात समाधानाने आशिर्वाद देतील..... मग, भगवंताने स्वतःहुन मिठी मारल्यासारखं वाटेल..

आज प्रत्येक जण पैसे कमवायच्या मागे लागलाय..... स्वतःच स्टेटस वाढवायचय् प्रत्येकाला.... कुणाच्यातरी आयुष्यात आपल्या वाटणीचा ओंजळभर आनंद देऊन तर बघा.... खात्रीने सांगतो त्यांच्या मनातलं तुमचं स्टेटस खुप ऊंचावर असेल.... अन् त्याच वेळेस भगवंताच्या मिठीची चाहुल लागेल..

व्याकुळ नजरेने पाहत असलेल्या मुक्या जनावरांना पाणी द्या.... अन्न द्या.... ते आमरस नाही हो मागत.... तुम्ही दिलेल्या शिळ्या पोळीतच ते खुष असतात...... कधी स्वतः जवळची ताजी पोळी देऊन तर बघा...... भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल..

आपल्याकडे आपलं असं काय आहे..? .... भगवंतानीच दिलेल्याचा आपण तोरा मिरवतो...... मग त्यानी दिलेलं ..... कधी कुणाला मनापासुन द्या....... मग बघा 

प्रत्येकामध्येच ईश्वर आहे फक्त त्या दिव्य दृष्टीने बघून त्याची सेवा करावी 

" भगवंत मिठी मारल्याशिवाय राहणार नाही.."

 संकलक....

जाधव समाधान सर

प्रिय अंतर्मना...

प्रिय अंतर्मना,   सप्रेम नमस्कार... दारापुढे रांगोळीचे रंग सांडलेत , आकाशात कंदील झुलू लागलाय आणि हवेत एक ओळखीचा , मंद गारवा मिसळला आहे......