My YouTube Channel
Tuesday, 20 February 2024
Monday, 12 February 2024
करिअर निवडतांना प्लॅन बी तयार असू द्यावा: डाॅ.अमित हरताळकर
Thursday, 8 February 2024
Thursday, 25 January 2024
घोडगाव येथील साने गुरुजी वाचनालयास डॉ.विकास हरताळकर यांनी दिली पुस्तके भेट...
घोडगाव येथील साने गुरुजी वाचनालयास डॉ.विकास हरताळकर यांनी दिली पुस्तके भेट...
घोडगाव ता चोपडा येथील साने गुरुजी वाचनालयास चोपडा येथील सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉ. विकास हरताळकर यांनी आज सदिच्छा भेट देऊन ५०० पुस्तके भेट दिली. या प्रसंगी त्यांचा सत्कार वाचनालयाचे ग्रंथपाल विजय दामोदर कोळी यांनी केला.या छोटेखानी समारंभात वाचनालयाचे चिटणीस विठ्ठल पुंडलिक पाटील यांनी प्रास्ताविक केले.वाचनालय चे अध्यक्ष प्रा. प्रदीप लिंबा पाटील यांनी आभार मानलेया प्रसंगी माजी सरपंच दिलीप कोळी, नरेंद्र विसपुते, ग्राम पंचायत सदस्य सुनील कोळी, युवराज रहाते, विजय न्हावी, चेतन बाविस्कर, विठ्ठल कोळी, संदीप पाटील, छोटू सोनार, भवरलाल जैन, बापू कोळी, हजर होते.Friday, 19 January 2024
भगवंताची मिठी
भगवंताची मिठी . . ...
भगवंताचं होणं ....... सोप्प नसतं हो भगवंताचं होणं... प्रचंङ निरागसता लागते... स्वच्छ मन लागतं. .
तुम्ही कधी भगवंताला मिठीत घेतलय का..?
नाही ना.....
कधी सहज म्हणुन कुणाला निरपेक्ष मदत केलीए का? करून बघा.... भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल..
अतिव दुःखात कुणाला आधार दिलाय का? देऊन बघा..... भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल..
कुणाच्या उर्त्कषाचं कारण व्हा....... कुणाच्या यशात भक्कम साथ द्या....... भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल..
कुणी कुणाचं नसतं हो..... तरीही कुणाचंतरी व्हायला काय हरकत आहे? आई नसलेल्याची आई व्हा..... कुणाची ताई व्हा...... कुणाचा बाप व्हा तर कुणाचा भाऊ.... मग बघा.... भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल..
कुणाच्या चेहर्यावरचं हास्य बना..... कुणाचे अश्रूंनी तुङुंब भरलेले डोळे पुसा.... मग, बघा.. भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल..
वार्धक्याने थकलेल्या पायांना तुमच्या हातांची ऊब द्या..... थरथर कापणारे हात समाधानाने आशिर्वाद देतील..... मग, भगवंताने स्वतःहुन मिठी मारल्यासारखं वाटेल..
आज प्रत्येक जण पैसे कमवायच्या मागे लागलाय..... स्वतःच स्टेटस वाढवायचय् प्रत्येकाला.... कुणाच्यातरी आयुष्यात आपल्या वाटणीचा ओंजळभर आनंद देऊन तर बघा.... खात्रीने सांगतो त्यांच्या मनातलं तुमचं स्टेटस खुप ऊंचावर असेल.... अन् त्याच वेळेस भगवंताच्या मिठीची चाहुल लागेल..
व्याकुळ नजरेने पाहत असलेल्या मुक्या जनावरांना पाणी द्या.... अन्न द्या.... ते आमरस नाही हो मागत.... तुम्ही दिलेल्या शिळ्या पोळीतच ते खुष असतात...... कधी स्वतः जवळची ताजी पोळी देऊन तर बघा...... भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल..
आपल्याकडे आपलं असं काय आहे..? .... भगवंतानीच दिलेल्याचा आपण तोरा मिरवतो...... मग त्यानी दिलेलं ..... कधी कुणाला मनापासुन द्या....... मग बघा
प्रत्येकामध्येच ईश्वर आहे फक्त त्या दिव्य दृष्टीने बघून त्याची सेवा करावी
" भगवंत मिठी मारल्याशिवाय राहणार नाही.."
संकलक....
जाधव समाधान सर
Monday, 15 January 2024
९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :
९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : दि.१ फेब्रुवारी २०२४ रोजी खान्देशस्तरीय कलानंद बाल मेळाव्यासाठी विवेकानंद विद्यालयातील जैनब तडवी,आरुषी पाटील व पर्वणी वैद्य यांची सादरीकरणासाठी निवड
अमळनेर येथे दि.१ ते ४ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान संपन्न होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दि. १ फेब्रुवारी रोजी खान्देशस्तरीय कलानंद बालमेळावा होणार आहे. त्याची निवडचाचणी नुकतीच अमळनेर येथीर साने गुरुजी विद्यालयातील एस.एम.गोरे सभागृहात दि.२६ डिसेंबर २०२३ रोजी पार पडली. यात विवेकानंद विद्यालय, चोपडा येथील विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आहे. यात कु. जैनब जावेद तडवी (इ.१०वी) व कु.आरुषी प्रदीप पाटील (इ.९वी) यांची कथाकथन यासाठी तर कु.पर्वणी प्रसाद वैद्य (इ.६वी) हिची नाट्यछटा सादरीकरणासाठी निवड झाली आहे.
या सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक, त्यांचे आई-बाबा व कुटुंबियांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष श्री.घनश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर,संस्थेचे सर्व विश्वस्त व पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री.नरेंद्र भावे, श्रीमती आशा चित्ते, सौ.माधवी भावे, सौ.सुरेखा मिस्तरी,पालकवृंद, शिक्षकवृंद व सर्व विभागातील विद्यार्थी मित्रमैत्रिणी यांनी केले आहे व त्यांच्या सादरीकरणासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
प्रिय अंतर्मना...
प्रिय अंतर्मना, सप्रेम नमस्कार... दारापुढे रांगोळीचे रंग सांडलेत , आकाशात कंदील झुलू लागलाय आणि हवेत एक ओळखीचा , मंद गारवा मिसळला आहे......
-
पुस्तक-बोलगाणी (कविता संग्रह) कवी- मंगेश पाडगावकर प्रकाशन- मौज प्रकाशन प्रकाशक-संजय भागवत पुस्तक परिचय द्वारा -प्रसाद वैद्य नमस्कार दोस्...
-
पुस्तक-चरित्रं अशी घडतात लेखक -प्रा. मिलिंद जोशी पुस्तक परिचय द्वारा -प्रसाद वैद्य नमस्कार मित्रांनो, कर्तृत्वाशिवाय व्यक...
-
चोपडा सातपुड्याच्या कुशीत पहुडलेले, ऐतिहासिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, इ. अशी बहु मुखी ओळख असलेले अंकलेश्वर ते बुर्...
.jpeg)










.png)

