My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Thursday, 6 June 2024

पत्रास कारण की...

पत्रास कारण की...

प्रियवर्ती वाचक, 

सस्नेह नमस्कार.

विवेकानंद विद्यालयातील उपशिक्षक श्री.विजेंद्र महाजन सर यांनी इ. ६वी अ च्या वर्गात पत्रलेखन हा उपक्रम राबविला त्यात सुरुवातीला विद्यार्थ्यांना त्याबद्दल मार्गदर्शन केले व कच्चे काम म्हणून वहीत पत्रलेखन करवून घेतले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड पुरविले व आपले नातेवाईक, लेखक, कवी,साहित्यिक,खेळाडू किंवा विद्यार्थ्यांना ज्यांना पत्र पाठवावेसे वाटेल त्यांना पत्र पाठवावे असे सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने या छान उपक्रमात सहभाग घेतला. 

पर्वणी वैद्य व गिरीराज पाटील या विद्यार्थ्यांना लेखिका प्रा.प्रभाजी बैकर यांची पत्रोत्तरे आली. या लेखिकेचा इ,सहावीच्या मराठी विषयाच्या पुस्तकात  'मले बाजाराले जायचं...' ही छान नाटिका अभ्यासक्रमात आहे.  विद्यार्थ्यांना ही छान शिदोरी लाभली याचा अतिशय आनंद वाटला.  अलिकडच्या काळात पत्रलेखन हे लोप पावत चाललंय असं म्हटलं जात असलं तरी सदानंद भावसार (पारोळा), डॉ. सर्वेश सोनी (नाशिक), श्री.लोहार(पुणे), प्रकाश देशपांडे (पुणे), मयूर दंतकाळे (अक्कलकोट), उदयकुमार पोतदार(बार्शी),श्री.दत्ता कोठावदे (नाशिक),निकेत पावसकर (सिंधुदुर्ग) यांनी व यांच्यासारख्या अनेक छंदप्रेमी लोकांनी या कलेला जीवंत ठेवलंय व त्याला एक वेगळीच उंची प्राप्त करुन दिलीय. विशेष म्हणजे अशा विविध छंद जोपासणाऱ्या छंदिष्ट लोकांना *छंदोमयी या WhatsApp* समूहाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे नोंद घेण्याजोगे काम *प्रसाद देशपांडे (नाशिक)* हे खूप चांगल्याप्रकारे करताय हे नमूद करतांना विशेष आनंद वाटतो. 
लेखिका प्रा. प्रभाजी बैकर (धुळे) यांचे कु. पर्वणी वैद्य
या विद्यार्थिनीस आलेले पत्रोत्तर

 'चला हवा येऊ द्या...' यासारख्या
कार्यक्रमातील
 अरविंद जगताप यांनी सामाजिक जाणीवांवर लिहिलेली आणि सागर कारंडे यांनी पोस्टमन काकांच्या भूमिकेत आपल्या दर्दी आवाजात वाचलेली पत्रं प्रेक्षक, वाचक व श्रोत्यांना साद घालतात आणि कधी कधी तर डोळ्यांच्या कडा ओलांडायलाही भाग पाडतात म्हणूनच त्याला भरभरुन दादही मिळते.

श्री. विजेंद्र महाजन सर यांनी अतिशय सुंदर अशा उपक्रमाद्वारे चिमुकल्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रेरणा दिली, त्यांना लिहितं केलं ही स्तुत्य बाब आहे. त्याबद्दल सरांचं सहर्ष अभिनंदन आणि या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक तसेच त्यांच्या आईबाबांचं व कुटुंबियांचंही सहर्ष अभिनंदन. शुभेच्छांसह...!

~प्रसाद वैद्य 

भ्रमणध्वनी- ९४२०११२२१५

(आपल्या प्रतिक्रिया Post a Comment Box मध्ये जरुर नोंदवाव्यात ही नम्र विनंती.)


No comments:

Post a Comment