My YouTube Channel

Click here to visit My YouTube Channel

Sunday, 21 April 2024

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे अंतर्गत घेण्यात येणार्‍या English व गणित या परीक्षांचे (फेब्रुवारी-2024) निकाल जाहीर ...

 विवेकानंद विद्यालयातील स्वरा हरताळकरनक्षत्र कापुरे राज्यस्तरावर यशस्वी... सहर्ष अभिनंदन...शुभेच्छांसह...!!! 

विवेकानंद विद्यालयातील स्वरा हरताळकर व नक्षत्र कापुरे टि.म.वि.,पुणे आयोजित इंग्रजी लेखन कौशल्य व गणित परीक्षेत राज्यस्तरावर यशस्वी...

चोपडा (प्रतिनिधी)

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे आयोजित इंग्रजी, गणित व इतर परीक्षांचा निकाल (फेब्रुवारी 2024) नुकताच जाहीर झाला. त्यात विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थिनी स्वरा विनीत हरताळकर (इ.८वी) ही English Writing Skill या परीक्षेत १०० पैकी ९० गुण मिळवून राज्यात प्रथम, तर गणित परीक्षेत १०० पैकी ९६ गुण मिळवून राज्यात द्वितीय आलेली आहे. यापूर्वी दोन वेळा English Grammar परीक्षेत स्वरा हरताळकर हिने राज्यस्तरावर देदीप्यमान यश प्राप्त केले आहे. त्याचबरोबर नक्षत्र बाळकृष्ण कापुरे (इ.७वी) हा विद्यार्थी गणित या परीक्षेत १०० पैकी ९७ गुण मिळवून राज्यात द्वितीय आला आहे.

गेल्या १२ वर्षांपासून विवेकानंद विद्यालयात टिमवि इंग्रजी ग्रामर परीक्षांचे आयोजन केले जात आहे. त्यात आजवर सात विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर देदीप्यमान यश प्राप्त केले आहे.  तसेच दोन वर्षांपासून टिमवि गणित परीक्षांचे आयोजन केले जात आहे. दोन्ही परीक्षेत राज्यस्तरावर यश प्राप्त केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. 

 English Writing Skill परीक्षेत यशस्वी  झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:

इयत्ता पाचवी

१)विहान अमोल मोदी (८१/१००)

२)मानस नरेंद्र पाटील  (८१/१००)

३)गीत अमित हरताळकर (७५/१००)

४)नक्षत्रा योगेश सोनवणे (७५/१००)

५)मनाली प्रवीण पाटील (७२/१००)

६)रोहन गणेश सोनार (६०/१००)

इयत्ता सहावी

१)पर्वणी प्रसाद वैद्य (९४/१००)

२)रुचिका जितेंद्र पाटील (७८/१००)

३)दिशा शाम बडगुजर (७४/१००)

४)दूर्वा मिलिंद बाविस्कर (६६/१००)

५)कार्तिकी दीपक पाटील (६५/१००)

इयत्ता सातवी

१)तेजस रमेश चौधरी (६०/१००)

इयत्ता आठवी

१)सानवी अतुल पाटील (८८/१००)

२)तन्मय ज्ञानदेव दातीर (७२/१००)

English Conversation Skill या परीक्षेत यशस्वी  झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:

इयत्ता पाचवी

१)गीत अमित हरताळकर (७८/१००)

२)विहान अमोल मोदी (७६/१००)

३)मानस नरेंद्र पाटील  (७३/१००)

४)नक्षत्रा योगेश सोनवणे (७१/१००)

५)रोहन गणेश सोनार (६३/१००)

इयत्ता सहावी

१)पर्वणी प्रसाद वैद्य (७६/१००)

२)कार्तिकी दीपक पाटील (७२/१००)

३)रुचिका जितेंद्र पाटील (७०/१००)

४)दूर्वा मिलिंद बाविस्कर (६६/१००)

इयत्ता सातवी

१)रोहन दिनेश चौधरी (७७/१००)

२)नक्षत्र बाळकृष्ण कापुरे (७५/१००)

३)तेजस रमेश चौधरी( (६७/१००)

४)वैष्णवी विनायक शिरसाठ (६४/१००)

इयत्ता आठवी

१)स्वरा विनीत हरताळकर (८६/१००)

२)सानवी अतुल पाटील (८३/१००)

गणित विषयाच्या परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:

इयत्ता पाचवी

१)विहान अमोल मोदी (९२/१००)

२)मनाली प्रवीण पाटील (९२/१००)

३)जान्हवी मनोज पवार(८०/१००)

४)जीनत जावेद तडवी (७७/१००)

५)पारवी रवींद्र पेंढारकर (७४/१००)

६)गीत अमित हरताळकर (७३/१००)

इयत्ता सहावी

१)पर्वणी प्रसाद वैद्य (९७/१००)

२)रुचिका जितेंद्र पाटील (९०/१००)

३)यज्ञेश भूपेश धनगर (७५/१००)

इयत्ता सातवी

१)नक्षत्र बाळकृष्ण कापुरे (९७/१००)

२)रोहन दिनेश चौधरी (९६/१००)

३)जिग्नेश अतुल पाटील (९२/१००)

४)सौम्या जुगलकिशोर पाटील (९०/१००)

५)तेजस रमेश चौधरी (८९/१००)

६)देवेन केशरलाल पाटील (८९/१००)

७)आर्यन दीपक पाटील (८९/१००)

८)गितेश ज्ञानेश्वर पाटील (८२/१००)

९)हर्षल जगदीश मराठे (७८/१००)

१०)श्रावणी सतीश पाटील (७६/१००)

११)वासुदेव यशवंत जाधव (७६/१००)

इयत्ता आठवी

१)स्वरा विनीत हरताळकर (९६/१००)

२)सुबोध अमृत पाटील (८९/१००)

३)सानवी अतुल पाटील (८८/१००)

४)हृतुजा किशोर पाटील(८३/१००)

५)काव्या रुपेश नेवे (७१/१००)

फेब्रुवारी महिन्यात या परीक्षा घेण्यात आल्या. 

विद्यालयातील उपशिक्षक संदीप कुलकर्णी, हेमराज पाटील,प्रसाद वैद्य व विद्या सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी या विषयाचे तर सरला शिंदे, नूतन चौधरी, राजेश्वरी भालेराव व गौरव पाटील यांनी विद्यार्थ्यांना गणित या  विषयाचे मार्गदर्शन केले. 

या सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या आईबाबांचे, कुटुंबियांचे व सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, माजी अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, उपाध्यक्ष घनःश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक नरेंद्र भावे,शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद व पालकवृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

Friday, 19 April 2024

विवेकानंद विद्यालयात बालशिक्षण व प्राथमिक शिक्षणाची कार्यपद्धती यावर शिक्षकांसाठी कार्यशाळा संपन्न...

विवेकानंद विद्यालयात बालशिक्षण व प्राथमिक शिक्षणाची कार्यपद्धती यावर शिक्षकांसाठी कार्यशाळा संपन्न...

चोपडा (प्रतिनिधी)
विवेकानंद विद्यालयात बाल शिक्षण व प्राथमिक शिक्षणाची कार्यपद्धती यावर आधारित दि.१४ एप्रिल ते १६ एप्रिल २०२४ तीन दिवसीय प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेत पहिल्या दिवशी संस्थेचे अध्यक्ष मा.डाॅ.विकास हरताळकर, सचिव मा.ॲड. रवींद्र जैन, सहसचिव मा.डाॅ. विनीत हरताळकर हे उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या पूजनाने कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.

विद्यालयाचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. नरेंद्र भावे यांनी 'मेंदू शिक्षण व ज्ञानरचनावाद' या विषयावर  शिक्षकांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती ज्योती अडावदकर यांनी 'प्राथमिक शिक्षणात भाषिक व शारीरिक विकासाची कार्यपद्धती' स्पष्ट केली.
प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी बालवाडी विभागाच्या प्रमुख सौ.माधवी भावे यांनी 'जीवन व्यवहार,कला व कार्यानुभवातून बालकाचा विकास कसा साधावा' या संदर्भात शिक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच दुसऱ्या सत्रात विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा चित्ते यांनी 'गाणी,गप्पा,गोष्टी यातून विद्यार्थ्यांचा भावनिक व सामाजिक विकास कसा साधावा' या संदर्भात मार्गदर्शन केले  
व कृतियुक्त गीत सादर केले. दुसऱ्या सत्रात पदवीधर शिक्षक तसेच अनेक शिक्षक प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मोलाची भूमिका पार पाडणारे श्री.देवेंद्र पाटील यांनी 'गणित व विज्ञान विषयांसंदर्भात बुद्धी विकासाची कार्यपद्धती' स्पष्ट केली.
कार्यशाळेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी विद्यालयातील उपशिक्षक श्री.संजय सोनवणे यांनी 'खेळ व मुक्त खेळ यातून बालकाचा विकास कसा साधावा' या संदर्भात सर्व शिक्षक बंधू-भगिनींकडून कृतियुक्त नाविन्यपूर्ण खेळ खेळून घेतले व त्यातून बालकांचा विकास कसा साधावा आणि बालकाला आनंददायी शिकते कसे करावे? हे त्यांनी स्पष्ट केले.दुसऱ्या सत्रात मा.डॉ.सौ.भावनाताई भोसले (गटशिक्षणाधिकारी (प्रभारी) पंचायत समिती,धरणगाव) यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणाची दिशा याविषयी मार्गदर्शन केले.कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ. विकास हरताळकर व संस्थेचे सचिव मा.ॲड.रवींद्र जैन यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच गटशिक्षणाधिकारी मा.श्री. अविनाश पाटील यांनी भेट देऊन सदर प्रशिक्षण व कार्यशाळेच्या आयोजनाबाबत विद्यालयाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. विद्यालयातील उपशिक्षक श्री. अभिषेक शुक्ल व उपशिक्षिका श्रीमती मेघा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी सर्व सहभागी शिक्षकांची नियोजित विषयावर  गुगल फाॅर्मच्या माध्यमातून पूर्वचाचणी व तिसऱ्या दिवशी उत्तरचाचणी घेण्यात आली व प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल ऑनलाईन स्वरुपात ई-प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. प्रसाद वैद्य यांनी गुगल फाॅर्म व ई-प्रमाणपत्राची निर्मिती केली.

Click Here बालशिक्षण कार्यशाळा उत्तर चाचणी

Thursday, 18 April 2024

एन.एम.एम.एस. परीक्षेत विवेकानंद विद्यालयाचे आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

एन.एम.एम.एस.परीक्षेत विवेकानंद विद्यालयाचे आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

चोपडा (प्रतिनिधी)
राष्ट्रीय परीक्षा परिषद, नवी दिल्ली आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती योजना (एन.एम.एम.एस.) या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात विवेकानंद विद्यालयातील इयत्ता आठवीच्या एकूण आठ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. गुणवत्ता यादीत निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:

१)चौधरी पियुष सुरेश गुण-117/200(GEN-23)
२)पवार खुशी मनोज गुण-109/200(GEN-53)
३)चौधरी श्रीकांत प्रशांत गुण-103/200(GEN88)
४)बडगुजर किमया निमेश गुण-97/200(GEN-145)
५)देशमुख विराज योगेश गुण-95/200(GEN-169)
६)बाविस्कर खुशी योगेश गुण-95/200(GEN-172)
७)कापुरे वेदश्री किरण
गुण-91/200(OBC-51)
८)जोशी सर्वेश कल्पेश गुण-76/200(EWS-14)
डिसेंबर महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला महिन्याला 1000रु. याप्रमाणे वर्षाला 12000रु.शिष्यवृत्ती प्राप्त होते. यातील प्रत्येक यशस्वी विद्यार्थी हा इयत्ता नववी ते बारावी या चार वर्षात एकूण ४८ हजार रुपये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. विद्यालयातील उपशिक्षक पवन लाठी यांनी या परीक्षेचे कामकाज पाहिले.
या सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या आईबाबांचे, कुटुंबियांचे व सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, माजी अध्यक्ष डॉ.विजय पोतदार,उपाध्यक्ष घनःश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त,मुख्याध्यापक नरेंद्र भावे, शिक्षकवृंद,कर्मचारीवृंद व पालकवृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

विविध वर्तमान पत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या ( सर्व पत्रकार बांधवांचे मन:पूर्वक आभार)
दैनिक नवराष्ट्र

सामना बुधवार दि. २४ एप्रिल २०२४