Monday, 15 January 2024

९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :

९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : दि.१ फेब्रुवारी २०२४ रोजी खान्देशस्तरीय कलानंद बाल मेळाव्यासाठी विवेकानंद विद्यालयातील जैनब तडवी,आरुषी पाटील व पर्वणी वैद्य यांची सादरीकरणासाठी  निवड

अमळनेर येथे दि.१ ते ४  फेब्रुवारी २०२४ या दरम्यान संपन्न  होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दि. १ फेब्रुवारी रोजी खान्देशस्तरीय कलानंद बालमेळावा होणार आहे. त्याची निवडचाचणी नुकतीच अमळनेर येथीर साने गुरुजी विद्यालयातील एस.एम.गोरे सभागृहात दि.२६ डिसेंबर २०२३ रोजी पार पडली. यात विवेकानंद विद्यालय, चोपडा येथील विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आहे. यात कु. जैनब जावेद तडवी (इ.१०वी) व कु.आरुषी प्रदीप पाटील (इ.९वी) यांची कथाकथन यासाठी तर कु.पर्वणी प्रसाद वैद्य (इ.६वी) हिची नाट्यछटा सादरीकरणासाठी निवड झाली आहे.  

या सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक, त्यांचे आई-बाबा व कुटुंबियांचे  अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष श्री.घनश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर,संस्थेचे सर्व विश्वस्त व पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री.नरेंद्र भावे, श्रीमती आशा चित्ते, सौ.माधवी भावे, सौ.सुरेखा मिस्तरी,पालकवृंद, शिक्षकवृंद व सर्व विभागातील विद्यार्थी मित्रमैत्रिणी यांनी केले आहे व त्यांच्या सादरीकरणासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.


No comments:

Post a Comment