समाधान
सहजच...
बंद पडलेली कार रस्त्यावर लावून मी बस मधे चढलो तर खरं..
पण आतली गर्दी बघून जीव घाबरला. बसायला जागा नव्हती. तेवढ्यात एक सीट रिकामी झाली.पुढचा एक जण सहज तेथे बसू शकत होता ....पण त्याने ती सीट मला दिली. पूढच्या stop. वर पुन्हा तेच घडले. पुन्हा आपली सीट त्याने दुसऱ्याला दिली. आमच्या पूर्ण बस प्रवासात हा प्रकार चारदा घडला,बर हा माणूस अगदी सामान्य दिसत होता,म्हणजे कुठे तरी मजदूरी करून घरी परत जात असावा,आता मात्र शेवटच्या stop. वर आम्ही सर्वच उतरलो.
तेंव्हा उत्सुकता म्हणून मी त्याच्याशी बोललो. विचारले की प्रत्त्येक वेळी तुम्ही तुमची सीट दुसऱ्याला का देत होता ??
तेंव्हा त्याने दिलेले उत्तर हे असे •••••
मी काही जास्त शिकलेला नाही हो.. अशिक्षितच आहे. मी एके ठिकाणी कमी पैशावर काम करतो पण माझ्या जवळ कुणाला देण्यासाठी काहीच नाही. ज्ञान नाही,पैसा नाही.
तेंव्हा मी हे अस रोजच करतो. आणि मी हे सहज करू शकतो.
दिवसभर काम केल्यानंतर अजून थोडा वेळ उभं राहणं मला जमत.
मी तुम्हाला माझी जागा दिली.तुम्ही मला धन्यवाद म्हणालात ना..त्यातच मला खूप समाधान मिळालं. मी कोणाच्या तरी कामी आलो, कोणाला काही तरी दिल्याच समाधान झालं..
असं मी रोजच करत असतो. हा माझा नियमच झाला आहे•••
आणि रोज मी आनंदाने घरी जातो.•••
उत्तर ऐकून मी थक्कच झालो. त्याचे विचार. व समज बघून याला अशिक्षित म्हणायचे का?
काय समजायचे ?
कोणाकरिता काही तरी करायची त्याची इच्छा ,
••••ती पण स्वतः ची परिस्थिती अशी असताना . •••मी कशा रीतीने मदत करू शकतो??
त्यावर शोधलेला उपाय बघून देव सुध्दा आपल्या या निर्मीतीवर खुष असेल. माझ्या सर्वोत्तम कलाकृती पैकी ही एक कलाकृती .
असं दिमाखात सांगत असेल .••••••
त्याने मला खूप गोष्टी शिकवल्या. स्वतःला हुषार शिक्षित समजणारा मी त्याच्या समोर खाली मान घालून स्वतःचे परिक्षण करू लागलो. किती सहज त्याने त्याच्या समाधानाची व्याख्या सांगितली. देव त्याला नक्कीच पावला असणार..
मदत ही खूप महाग गोष्ट आहे कारण मनाने श्रीमंत असणारे खूप कमी लोक असतात .•••••
सुंदर कपडे, हातात पर्स , मोबाईल , डोळ्यांवर गॉगल, चार इंग्लिशचे शब्द येणे म्हणजेच सुशिक्षत का ? हीच माणसाची खरी ओळख का ? मोठं घर , मोठी कार , म्हणजे मिळालेले समाधान का ?
कोण तुम्हाला केंव्हा काय शिकवून जाईल????? व तुमची धुंदी उतरवेलं सांगता येत नाही .•••
या माणसाच्या संगतीने माझे विचार स्वच्छ झाले.
म्हणतात ना •••
" कर्म से पहचान होती है इंसानों की ।
वरना महंगे कपड़े तो पुतले भी पहनते हैं दुकानों में "..
~संकलन