Thursday, 10 July 2025
Sunday, 6 July 2025
Monday, 30 June 2025
Monday, 23 June 2025
Saturday, 21 June 2025
Admission Form (Activity)
Admission Form (Live English Activity Std. 10th)
SCAN THIS QR CODE FOR THIS FORM
Click Here For Application Form PDF
विवेकानंद विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा...
चोपडा दि.२१: येथील विवेकानंद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात ॐकार व प्रार्थना म्हणून सकाळी ५.४५ वाजता झाली. त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नरेंद्र भावे यांनी योग दिनाचे महत्त्व स्पष्ट केले आणि दैनंदिन जीवनात योगाचे फायदे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना विविध योगासने आणि प्राणायाम प्रकारांचे प्रात्यक्षिक दाखवले. यामध्ये वृक्षासन, भुजंगासन, शवासन, हस्तपादासन, उत्तान पादासन,त्रिकोणासन यांसारख्या सोप्या पण महत्त्वाच्या आसनांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सर्व सूचनांचे पालन करत योगासने केली. प्राणायामाचे महत्त्व आणि ते कसे करावे, याबद्दलही सविस्तर माहिती देण्यात आली.
योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास कशी मदत होते त्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले .सर्व विद्यार्थ्यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक छान सादर केल्याबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी सर्वांचे कौतुक केले. तसेच भविष्यातही अशी आरोग्यासाठी उपयुक्त असणारी योगासने नियमित करावीत असे आवाहन केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाभ्यासाविषयी जागरूकता निर्माण झाली आणि निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित झाले.
Wednesday, 2 April 2025
एन.एम.एम.एस.परीक्षेत विवेकानंद विद्यालयाचे पंधरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत
राष्ट्रीय परीक्षा परिषद, नवी दिल्ली आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती योजना (एन.एम.एम.एस.) या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात विवेकानंद विद्यालयातील इयत्ता आठवीच्या एकूण पंधरा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे.
गुणवत्ता यादीत निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे
१) नक्षत्र बाळकृष्ण कापुरे २) वासुदेव यशवंत जाधव ३) सौम्या अरुण पाटील ४) सौम्या जुगल किशोर पाटील ५) गौरव दिलीप माळी ६) गौरव जितेंद्र चौधरी ७) लावण्या सचिन पाटील८) चंद्रेश अनिल शिरसाट ९) भूषण संतोष पाटील १०) जिग्नेश अतुल चौधरी ११) गितेश ज्ञानेश्वर पाटील १२) दिवेश चंद्रशेखर कंखरे १३) दिव्येश रमेश चौधरी १४) रुद्र किरण पाटील १५) दुर्गेश किशोर पाटील
डिसेंबर महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला महिन्याला १००० रु. याप्रमाणे वर्षाला १२०००रु. शिष्यवृत्ती प्राप्त होते. यातील प्रत्येक यशस्वी विद्यार्थी हा इयत्ता नववी ते बारावी या चार वर्षात एकूण ४८ हजार रुपये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. विद्यालयातील उपशिक्षक पवन लाठी यांनी या परीक्षेचे कामकाज पाहिले.
या सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या आईबाबांचे, कुटुंबियांचे व सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, माजी अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, उपाध्यक्ष घनःश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक नरेंद्र भावे,शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद व पालकवृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.