Tuesday, 2 November 2021

दिवाळीस पत्र...

 छायाचित्र सौजन्य- सौ.जयश्री पुणतांबेकर मॅडम

दिवाळीस पत्र...

प्रिय दिवाळी,

सस्नेह नमस्कार.  

        तू अनादी काळापासून टिकवून ठेवलेलं तुझं चैतन्य नेहमीच उत्साह प्रदान करतं गं! कसं जमतं हे तुला! तुझं येणं हे रावाचा आणि रंकाचाही आनंद द्विगुणीत करतं. कदाचित काही वेळा रंकाला तुझं येणं परवडत नसतं; पण 'झाकली मूठ सव्वा लाखाची' ठेवून तो तुझं येणं साजरं करतोच करतो, ते तो तुलाही कळू देत नाही.

तुझं उजळणं आणि उजळवणं हे आमच्यासाठी आनंदाची 'पर्वणी'असतं. 

तुझं येणं आबालवृद्धांसाठी 'निर्मिती'चा आविष्कार असतं...

तुझं येणं म्हणजे स्वच्छ आकाश...

तुझं येणं म्हणजे लख्ख प्रकाश...

तुझं येणं म्हणजे  बच्चे कंपनीची दंगल...

तुझं येणं म्हणजे नात्यांसाठी मंगल...  

तुझं येणं म्हणजे अंगण सजणं असतं... 

तुझं येणं म्हणजे आसमंत उजळणं असतं...

तुझं येणं म्हणजे गोडधोड पदार्थांची रास...

तुझं येणं म्हणजे दिव्यांची आरास... 

तुझं येणं म्हणजे सुगंध दरवळणं...

तुझं येणं म्हणजे आईने लेकरांना कुरवाळणं...

तुझं येणं म्हणजे सुगंधी उटणं...

तुझं येणं म्हणजे मिठाई वाटणं...

तुझं येणं म्हणजे काहींचं 'जमणं'...

तुझं येणं म्हणजे काहींचं रमणं...

तुझं येणं म्हणजे राजस...

तुझं येणं म्हणजे वसुबारस...

तुझं येणं म्हणजे 'मोती स्नानाची' वेळ होणं...

तुझं येणं म्हणजे पाडव्याची सांगितिक पहाट होणं...

तुझं येणं म्हणजे भाऊबीजेची ओवाळणी...

तुझं येणं म्हणजे 'होम मिनिस्टरची' पाडव्याला पैठणी...

तुझं येणं म्हणजे अभ्यंगस्नान...

तुझं येणं म्हणजे झुकून थोरांचा सन्मान...

तुझं येणं म्हणजे Leisure...

तुझं येणं म्हणजे Pleasure...

तुझं येणं म्हणजे अनेकांचं आश्वासन...

तुझं येणं म्हणजे सुयोग्य प्रशासन...

तुझं येणं म्हणजे नाटकाचा पहिला प्रयोग..

तुझं येणं म्हणजे विविधरंगी,वेचक-वेधक दिवाळी अंकांचा योग...

तुझं येणं म्हणजे तरुणांचा कट्टा...

तुझं येणं म्हणजे महिला मंडळाच्या गप्पा...

तुझं येणं म्हणजे कुटुंबाची लगबग...

तुझं येणं म्हणजे लाईटिंगची झगमग...

तुझं येणं म्हणजे तरुणाईची हुल्लडबाजी...

तुझं येणं म्हणजे फटाक्यांची आतषबाजी...

तुझं येणं म्हणजे नवीन गाडी घेणं...

तुझं येणं म्हणजे स्वप्नातील नवीन घर होणं...

तुझं येणं म्हणजे शक्ती...तुझं येणं म्हणजे भक्ती...

तुझं येणं म्हणजे 'रिश्तों में प्यार बाँटना'...

तुझं येणं म्हणजे  'हम साथ साथ है' कहना...

तुझं येणं म्हणजे कमाल...

तुझं येणं म्हणजे धमाल...

तुझं येणं म्हणजे विलास... 

तुझं येणं म्हणजे विकास...

तुझं येणं म्हणजे दिवेही आनंदी अन् पणत्याही उत्साही... 

तुझं येणं म्हणजे आनंदी आनंद गडे  जिकडे तिकडे चोहीकडे....

        शेवटी काय आयुष्य आणि वर्तमान कितीही ठणकत असलं तरीही तू ये. कारण तुझ्या उजेडाचा उत्सव हा संस्कृतीच्या शृंगाराचाच एक भाग आहे. त्यामुळेच तुझं 'येणं' म्हणजे संस्कृतीचं 'लेणं' असतं म्हणूनच आम्ही तुझं 'देणं'लागतो. 

        तुझ्या लेकरांना  सदैव जगण्याचं बळ अन् निरामय आरोग्य आणि चैतन्य लाभू दे तुझ्यासारखंच. तुझी आम्हां सर्वांवर कृपा राहू दे....तू आहेसच अशी शुभदायिनी  'शुभ दीपावली' !!!

तुझाच स्नेह प्रार्थी,

~प्रसाद वैद्य 

(शिक्षक,पत्र-मित्र,शुभेच्छापत्र संग्राहक)

विवेकानंद विद्यालय, चोपडा जि. जळगाव 

मोबाईल-९४२०११२२१५

23 comments:

  1. अप्रतिम मित्रा!
    असाच लिहिता रहा....आमच्यासाठी ही 'पर्वणी' आहे

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद.कृपया आपलं नाव कळू शकेल का? शुभ दीपावली.शुभेच्छा. भेटुया.

      Delete
  2. मनाला हळवुन टाकनारा लेख
    शुभु दिपावली सर

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद.कृपया आपलं नाव कळू शकेल का? शुभ दीपावली.शुभेच्छा. भेटुया.

      Delete
    2. मनःपूर्वक धन्यवाद.कृपया आपलं नाव कळू शकेल का? शुभ दीपावली.शुभेच्छा. भेटुया.

      Delete
  3. अतिशय सुंदर 🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद.कृपया आपलं नाव कळू शकेल का? शुभ दीपावली.शुभेच्छा. भेटुया.

      Delete


  4. बये दिवाळी,
    तुझं येणं....
    म्हणजे संस्कारांचं लेणं,
    जुन्या पिढीनं नव्या पिढीला,
    दिलेलं समृध्दीचा देणं.!

    खूप मनभावन पत्र लिहलंय प्रसादजी.
    अभिनंदन.!

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद चौधरी सर.आपला मनमोकळा प्रतिसाद नेहमीच मला साद घालतो.कालच मयूर दंतकाळे यांच्या Status ला आपला व्हिडिओ बघितला. खूप आनंद वाटला.आपला आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू द्यावा.शुभ दीपावली. शुभेच्छा.भेटुया.😊👏🪔🌺🌸
      ~प्रसाद वैद्य व परिवार

      Delete
  5. अप्रतिम सरजी.. आपले लिखाण हृदयस्पर्शी आहेच.. सोबत संस्कृती संवर्धन आणि संस्कार पेरणी करणारे आहे. अनंत शुभेच्छा...

    ReplyDelete
  6. 👌तूमचं लिखाण म्हणजे विचारांची सुंदर रांगोळी....असंच लिहीत रहा म्हणजे आमची वाचनाची दिवाळी...!!

    ReplyDelete
  7. प्रसाद दादा आपले मनःपूर्वक अभिनंदन .आगळीवेगळी दिवाळी👍 माझ्यासारख्या शिक्षकाला आपल्या लेखनातून कायम प्रेरणा मिळते.
    दिवाळीच्या आपणास व वैद्य परिवारास शुभेच्छा!!!!

    ReplyDelete
  8. सदाबहार लेख

    ReplyDelete
  9. फारच सुंदर सरजी 👌👍

    ReplyDelete
  10. खुप छान लिहले आहे प्रसाद!
    दिवाळी सोबत साधलेला संवाद अप्रतिम!
    भावी वाटचाली साठी शुभेच्छा. शुभ दिपावली 👏🏻

    ReplyDelete
  11. ह्रदयस्पर्शी लेख

    ReplyDelete
  12. सर्व स्नेहीजन,
    सस्नेह नमस्कार.
    आपला दिलखुलास प्रतिसाद हा माझ्यासाठी खूप मोलाचा आहे.हीच माझी प्रेरणा अन् ऊर्जा आहे. स्नेह हमेशा बना रहे. शुभेच्छा. शुभ दीपावली.

    ReplyDelete
  13. Khup sundar vichar mandani👍👍
    Marathi varch prabhutv 1no...keep it up Jiju👍👍

    ReplyDelete
  14. फारच सुंदर व अप्रतिम.... प्रसाद भाऊ,आपल्या मार्फत दिवाली ला लिहिलेले मन्तव्य खरंच आणि वास्तविक परिस्थिती चे शब्दांकन आहे... मनापासून शुभेच्छा व अभिनंदन....

    ReplyDelete
  15. खुप सुंदर लिहीलं आहे सर 🥳👌👌

    दिवाळी म्हणजेच उत्सवाचा अखंड झरा...
    दिवाळी म्हणजेच आनंदाचा सोहळा...
    दिवाळी म्हणजेच फराळाचा गोतावळा...
    दिवाळी म्हणजेच उजेड नव्या स्वप्नांना...
    दिवाळी म्हणजेच उमेद नव्या आयुष्याची...
    दिवाळी म्हणजेच सुरूवात भरभराटीची...

    ©® मानसी सोनार

    ReplyDelete